राष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे भव्य अधिवेशन दिल्ली येथे संपन्न*

राष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे भव्य अधिवेशन दिल्ली येथे संपन्न*

नवी दिल्ली - 27 मे 2023

नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष श्री. राहुल डंबाळे व रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष लुकस (प्रशांत) केदारी, झुबेर मेमन यांच्या संकल्पनेतून साकारलेले नवी दिल्लीतील संविधान भवन येथे अल्पसंख्यांकांची भव्य अधिवेशन यशस्वी झाले.

दिल्ली याठिकाणी झालेल्या वैचारिक शानदार सोहळ्यात अल्पसंख्यांकाच्या प्रश्नावर तीव्र विचार मंथन व ठराव मंजूर करण्यात आले.

अल्पसंख्यांकाचे प्रश्न मांडण्यासाठी सर्व भारत भरातून सर्व मुस्लिम, ख्रिश्चन,बुद्धिस्ट समाजाचे नेते प्रतिनिधी सहभागी झाले होते.

माजी पो. महासंचालक अब्दुर रहमान,खा. पी. विल्सन,खा.(डीएमके ),इम्तियाज जलील(एम आयएम )खा.नबीदूल हक(त्रुनमूल काँग्रेस)खा.गौतम पाल(आम आदमी पक्ष),खा. अशोक भारती, माजी महापौर सिद्धार्थ धेंडे, ए सी मायकल,पी आय जोस,जॉन दयाल, अशोक भारती, रशीद शेख,नाजीर तांबोळी,जेनेट डीसूझा, अशा मान्यवारानी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची सुरुवात लुकस केदारी यांच्या उत्कृष्ट प्रस्तावणेने झाली, त्यानंतर राहुल डंबाळे यांनी पुढील भूमिका जोमाने मांडली.

अल्पसंख्यांक प्रश्नाविषयीं 7 कलमी कार्यक्रम मंजूर करण्यात आला, त्यात महत्वाचे मुद्दे, संविधानिक अधिकार, बजेट मध्ये अल्पसंख्यांकाणा 20% वाटा, राजकीय प्रतिनिधित्व व संधी इत्यादी ठराव सहमताने मंजूर करण्यात आले.आर्च बिशप (नवी दिल्ली) अनिल कुटो म्हणाले आपल्या हक्कासाठी शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे, अब्दुर रहमान यांनी अल्पसंख्यकांनी भारत देश हिंदू बांधवांच्या बरोबरीने सुजलाम केला असे सांगितले, ए. सी.मायकल यांनी अशा प्रकारची चळवळ राहुल डंबाळे आणि लुकस (प्रशांत) केदारी यांनी दिल्लीत येऊन यशस्वी केली याबद्दल अभिनंदन केले.

   अल्पसंख्याक समाजावर रोज नवनवीन प्रकारे अत्याचार होत आहेत, दंगली देखील रोखल्या जाऊ शकतात असे खा.जलील यांनी सांगितले, खा. नाबा कुमार आसाम यांनी पूर्ण भारत राष्ट्रात ऐक्य निर्माण होण्यासाठी झटणार व अल्पसंख्यांक समुदायाचे प्रश्न सोडविण्यासाठी झटणार असे सांगितले,खा. हक यांनी अल्पसंख्यांक प्रश्नासाठी नेहमी तत्पर राहू असे सांगितले, खा. गौतम यांनी सध्या लोकशाही रसातळाला गेली आहे असे सांगितले, पी आय जोस यांनी 2024 च्या निवडणुकीत मतदारांनी सरकारला धडा शिकवा असे सांगितले.

    भारत भरातून आलेल्या व विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रात उत्तम कार्य केलेल्या 45 विभूतींचा "संविधान पुरस्कार"देऊन सत्कार करण्यात आला.महिला वर्गासाठी व्यासपीठावर घेऊन विशेष सत्कार व सेशन घेण्यात आले, यात हसीना इनामदार, सिस्टर अनिता, सुवर्णा डबाळे, प्रतिमा केदारी, मेंनाक्षी सिंग, सलूमी तोरणे, मेरी पार्गे, रिजवाना पठाण यांनी सहभाग नोंदविला.सर्व भारतीयांनी एकत्र राहून तत्पर राहिले पाहिजे व चळवलीत सहभागी राहिले पाहिजे, तसेच सर्व उपस्थितांचे डंबाळे यांनी आभार मानले, जॉन फर्नांडिस, अॅड. अंतोन कदम, जॉन मन्तोडे, अल्फान्सो अण्णा, अल्बर्ट मायकल यांचा परिषदेद्वारे  सत्कार आला.

    या परिषदेचे पूर्वतयारीसह संपूर्ण आयोजन-नियोजन  आर सी एस चे अध्यक्ष व ख्रिस्ती समाजाचे आधुनिक विचारांचे नेतृत्व करणारे प्रशांत (लुकस) केदारी यांचे आभार व त्यांच्या समाजिक बांधिलकीप्रती असलेल्या  आत्मियतेबद्दल सर्वांनी विशेष आभार व्यक्त करीत हर्श उल्हासात अभिनंदन केले!