पोलीस जाणीव सेवा संघ बार्शीच्या वतीने मुंबई येथे 26/11 च्या अतिरेकी भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पोलीस जाणीव सेवा संघ बार्शीच्या वतीने मुंबई येथे 26/11 च्या अतिरेकी भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)

बार्शी-      पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.रवी सर फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली,

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या अतिरेकीच्या चकमकीत दहशतवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस वीर जवानांना व निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने प्रगती विद्यामंदिर शाळा बार्शी या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आदर करत संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व महिला वर्ग उपस्थित होते.