**सावनेर**शहरात ची स्वच्छता**चव्हाट्यावर** **शहराच्या कचरा उचलणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारावर सावनेर नगर परिषद अधिकारी महेरबान**
1.
*सावनेर* **शहरातील स्वच्छता चव्हाट्यावर ?*
*शहराचा कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारावर सावनेर नगरपरिषद अधिकारी मेहेरबान !!!*
news Nagpur-s-35
https://Bpslivenews.in
*सावनेर* : देशातील सर्व शहरांमधील व गाव-खेड्यामध्ये नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे.
या अभियानास वाढता प्रतिसाद मिळत आहे. घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल… गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल... शहर स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल,अश्या पर्यायाने देशही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनीं देश स्वच्छ करण्याचा संकल्प स्वच्छ भारत अभियानातून मांडला होता . त्यांचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्राचा हातभारही मोठ्या प्रमाणात लागत आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत संकल्पाला आता महाराष्ट्राने आणखी व्यापक स्वरुप देण्याचे ठरविले आहे. त्यातूनच आता राज्यातील नागरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यास सुरूवात झालेली आहे.
भारत हा स्वच्छ देश म्हणून ओळखला जावा, यासाठी केंद्राने राबविलेली योजना महत्त्वपूर्ण आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी राज्याचा हातभारही लागणे आवश्यक आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने नागरी भागातील स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून या दृष्टीने व्यापक प्रयत्न करण्यात आले होते. यापुढील काळातही या अभियानाची व्याप्ती वाढवून संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे त्यातलेच एक पाऊल आहे.
पण नागपुर जिल्हातील सावनेर नगरपरिषद हद्दीतील कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारावर मुख्याधिकाऱ्यांचा कोणताही वचक नसल्याने व कचरा उचल करण्याकरिता नगरपरिषद कडून कोणतेही वेळापत्रक आणि नियोजन नसून संबंधित कंत्राटदार जोमात आहे .
सावनेर स्थित बाजार चौक परिसरात साचलेला कचरा दुपारपर्यंत शहरात तसाच पडून राहते .त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सावनेर शहराचा कचरा उचलण्यासाठी कंत्राट दाराला लाखो रुपयांचे टेंडर दिले असल्याने त्याचा बोजा सावनेर शहरातील सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडत आहे. जेणेकरुन सावनेर शहरातील स्वचछता अभियान चव्हाट्यावर आलेली आहे.
सावनेर नगरपरिषदेचे नगरसेवकांचा कार्यकाळ 8 फेब्रुवारी 2022 रोजी संपल्यामुळे सावनेर नगरपरिषदवर प्रशासकीय राज आले असून नगराध्यक्षचा कारभार सावनेर येथील उपविभाीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे असून प्रशासकीय अधिकारी हर्षला राणे मुख्याधिकारी म्हणून कारभार सांभाळत असून सुद्धा सावनेर शहरातील स्वच्छतेची अशी दयनीय दशा आहे.
अशा परस्थितीमध्ये सावनेर शहराच्या वाली कोण ?
असा प्रश्न ही सावनेरकरांचा डोळ्यासमोर उपस्थित झालेला आहे .