बार्शी तालुक्यातील 77 कि.मी. रस्त्यासाठी 19 कोटी 37 लाख रुपये निधी मंजूर आ.राजेंद्र राऊत
बि पि एस राष्ट्रीय न्यूज
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी. बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागासाठी 77 कि.मी. लांब असलेल्या रस्त्यांसाठी 19 कोटी 37 लाख रुपयांचा निधी वर्ष 2022-23 या अर्थ संकल्पनेतून मंजूर झाला आहे अशी माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
ह्या रस्त्याची पूर्ण काम झाल्यावर तालुक्यातील लोकांना, ग्रामस्थांना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही व चांगल्या प्रकारे दळणवळण होण्यास मदत होईल असेही आ.राऊत यांनी सांगितली.
या अर्थसंकल्प वैराग- हिंगणी- तळेगाव -चिखर्डे -गोरमाळे -पांगरी उक्कडगाव ते जिल्हा हद्द या 9 कि.मी. रस्ता सुधारण्याकरिता 3 कोटी 80 लाख रूपये.
तर बार्शी -कव्हे- कोरफळे -मालवंडी -मानेगाव या 10.5 कि.मी. रस्ता सुधारणा करिता 1 कोटी 90 लाख रुपये, बार्शी- आगळगाव काटेगाव -चुंबक- कोरेगाव 20.7 कि.मी. रस्ता सुधारण्याकरिता 3 कोटी 80 लाख रुपये, गौडगाव ते कात्री या 2.5 किमी रस्ता सुधारणा करिता 1 कोटी 42 लाख रुपये, कासारी ते जिल्हा हद्द या 4 किमी रस्ता सुधारण्याकरिता 1 कोटी 14 लाख रुपये, श्रीपत पिंपरी ते राज्यमार्ग क्रमांक 145 ला जोडणारा 5.5 कि.मी. रस्ता सुधारणा करिता 1 कोटी 71 लाख रुपये, रुई- अंबाबाई वाडी -ज्योतीबाची वाडी या 10 कि.मी. रस्ता सुधारण्याकरिता 2 कोटी 37 लाख रुपये, तडवळे ते राळेरास या 8 कि.मी. रस्ता सुधारण्याकरिता 1 कोटी 90 लाख रुपये, शेंद्री ते उपळाई ठोंगे या 6 कि.मी. रस्ता सुधारणा करिता 95 लाख रुपये.
अशाप्रकारे रस्ता कामकाजासाठी निधी मंजूर झाला असेही आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले