उन्हाची कहाली . लिंबाची सावली .
वडुले बुद्रुक (ता शेवगाव) येथे दुपारच्या वेळी सावलीला विसावलेला मेंढ्याचा कळप
दरवर्षी पेक्षाही यंदाचा उन्हाळा अधिक खडक असून माणसा सोबतच जनावरांचे देखील हाल होत आहेत त्यामुळे दुपारच्या वेळी मेंढ्या आपसूकच सावलीच्या आश्रयाला जात आहेत. त्यांना चारा व पाण्याची सोय करण्यासाठी यंदा त्रास सहन करावा लागत आहे .
भाऊसाहेब शेलार मेंढपाळ सामनगाव.
कडक उन्हाच्या तीव्रतेमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे दिलासा मिळत असला तरी उकाडा कायम आहे उन्हामुळे दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदी असल्याचे जाणवत आहे. नागरिकांत सोबतच वन्य प्राणी व पाळीव प्राणी देखील सावली व पाण्याचा आश्रय घेतात. यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा 40 अंशाचा वर गेला आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्याने दुपारच्यावेळी जनजीवन पूर्णपणे ठप्प होत आहे. शहरातील दुकानदार देखील 12 ते 3 या वेळेत दुकाने बंद ठेवतात. ग्रामीण भागातही शेतात सुरू असलेली मशागतीची व इतर कामे सकाळच्या व संध्याकाळच्या सत्रात केली जात आहेत. ग्रामीण भागात जनावरांचे कळप घेऊन दिवसभर चाऱ्यासाठी भटकंती करणारे मेंढपाळ शेळ्या व जनावरांचे कळप दुपारच्यावेळी सावलीत विसावलेले दिसतात उन्हाच्या काहिली तून सुटका होण्यासाठी पावसाच्या आगमनाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.