शेवगाव एस .टी .डेपो बस स्थानकाचा अजब कारभार मेरी मार्गे अहमदनगर बसच नाही तालुक्यातील या मार्गावरील प्रवासी शेतकरी आणि विद्यार्थी यांचे हाल

शेवगाव एस .टी .डेपो बस स्थानकाचा अजब कारभार  मेरी मार्गे अहमदनगर बसच नाही तालुक्यातील या मार्गावरील प्रवासी शेतकरी आणि विद्यार्थी यांचे हाल

शेवगाव तालुक्याचा एसटी डेपो पूर्ण क्षमतेने सुरू होऊन बरेच दिवस झाले परंतु काही मार्गावरील ठरावी गाड्या कुठल्या सबळ कारणाशिवाय का बंद आहेत याचे कोडे अजून शेवगाव करांना उलगडले नाही.

लांब पल्ल्याच्या नाशिक धुळे पुणे मुंबई औरंगाबाद बीड परभणी या सर्व गाड्या मोठ्या जोमात सुरू असून शेवगाव शहरातून खेड्यापाड्यात विद्यार्थी शेतकरीवर्ग तलुजच्या ठिकाणी सरकारी कार्यालयात ये-जा करणारे नागरिक आणि बाजार करू यांच्या सोयीसाठी बस केव्हा सुरू होणार याची विद्यार्थी पालक नागरिक आणि लाल परिवार अवलंबून असलेले सर्व सामान्य प्रवासी नागरिक यांचे अतोनात हाल होत आहेत. त्याचा फायदा डूग डूगे टम पण आणि खाजगी प्रवासी वाहतूक करणारे अडवणूक करून प्रवाशांची लूट करत आहेत. शेवगाव प्रवासी संघटनेचे पदाधिकारी व सभासद सापडल्यास त्यांना बसस्थानकात आणून सोडावे. 

शेवगाव मिरी मार्ग अहमदनगर या मार्गावर शेवगाव तालुक्यातील वडोले सामनगाव मळेगाव आव्हाने आपेगाव आखतवाडे ढोरजळगाव मलकापुर लिंबे नांदुर नेवासा तालुक्यातील माका लक्ष्‍मी हिवरे पाथर्डी तालुक्यातील मिरी आदी महत्त्वाची आणि शेवगाव बाजारपेठ शिक्षण वैद्यकीय व्यवसायावर परिणाम करणारी गाव अवलंबून आहेत पण तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला काहीही देणे घेणे नाही या भागातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करुन शाळा गाठावी लागते तसेच सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा अडचणींना सामोरे जावे लागते

ज्या नागरिक विद्यार्थी शेतकरी व्यापारी यांना एसटी संदर्भात अडचण आहे त्यांनी मी शेवगावकर संघटनेशी संपर्क साधून आपल्या समस्या मांडाव्यात संपर्क 99 60 05 17 55