एस. टी कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत मुदतीचा इशारा.

एस. टी  कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत मुदतीचा इशारा.

बी पी एस राष्ट्रीय न्यूज

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

मुंबई-     संपावर असलेल्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांना सरकारने अंतिम इशारा दिलेला आहे की, 31 मार्चपर्यंत सर्व संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे अन्यथा नाईलाज असल्याकारणाने कठोर पावले उचलावी लागतील अशा कठोर शब्दात सरकारने इशारा दिला असे विधानसभेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

एसटी च्या विलीनीकरणासाठी त्रिसदस्य अहवाल बैठकीत हा निर्णय मान्य केलेला आहे.

या समितीने एसटी चे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण होणार नाही असे आणि परब यांनी स्पष्ट केले. एस टी कर्मचारी हे हट्टीपणा करत आहेत यांना अपेक्षेपेक्षा जास्त पगार देऊनही व इतर सुविधा देऊन सुद्धा बरेच कामगार संपावर कायम आहेत त्यांना 31 मार्चपर्यंत कामावर यावे ही अखेरची संधी आहे अशा कठोर शब्दात अनिल परब यांनी स्पष्ट केले.

विधानभवनात पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पण एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हावे अशी विनंती केली आणि जर कर्मचारी कामावर रुजू नाही झाल्यास  खासगीकरण न करता भाड्याच्या स्वरूपात एसटी देऊन जनतेची सेवा पुरवली जाईल असे पवार यांनी सांगितले.

यामध्ये एस टी महामंडळ 3000 बस खरेदी करणार आहे, यापैकी 1000 सीएनजीच्या तर दोन हजार इलेक्ट्रिकल असतील असे ही पवार त्यांनी बोलताना सांगितले.