*आई तुळजाभवानी मातेच्या पालखी मिरवणुकीचा मान बार्शी तालुक्यातील आगळगाव गोरमाळकरांना*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)
बार्शी- राज्यातील साडेतीन शक्तीपीठा पैकी एक असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या पालखी मिरवणुकीचा मान सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आगळगाव व गोरमाळे येथील ग्रामस्थांना मिळाला.
आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भावीक तुळजापूर येथे येतात. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर राज्य लगतच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यातून सुद्धा महाराष्ट्रातील कुलदैवत असलेल्या मातेच्या दर्शनासाठी भाविक लाखोच्या संख्येने येतात. नवरात्र महोत्सव दरम्यान दसऱ्या दिवशी पहाटे पहाटे आई तुळजाभवानी मातेची पालखी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालते. संपूर्ण वर्षभरात या दसऱ्या दिवशी मातेची मूर्ती मुख्य गाभरातून बाहेर काढून त्या मूर्तीसहीत पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. त्याच पालखीचा जवळ-जवळ दीडशे वर्षांपासून पुढच्या पालखीच्या शिड्याचा मान आगळगावकऱ्यांना व मागच्या शीड्यांचा मान गोरमाळे या गावांना आहे. ही दोन्ही गावे बार्शी तालुक्यातील आहेत.
ज्या पालखीतून देवीचे मिरवणूक काढली जाते ती अहमदनगर येथील तेली समाजाचे लोक तयार करतात. ही पालखी अहमदनगर -जामखेड- भूम -आगळगाव -घारी गोरमाळे- भातंबरे मार्ग दसऱ्या दिवशीच्या आदल्या दिवशी तुळजापूर येथे पोहोचते.
पालखी नदीच्या पुरामुळे तुळजापुरला जाणे शक्य नव्हते त्यावेळी आगळगाव मधील ग्रामस्थांनी आपल्या जीवाची परवा न करता ही पालखी योग्य वेळी योग्य त्या टाईमला तुळजापूर येथे पोहोचवली त्यामुळे आगळगाव येथील ग्रामस्थांना ही पालखी मिरवणुकीचा मान मिळाला असे (अख्यायीका) सांगण्यात येते.