बार्शी मध्ये 80 वर्षाच्या वृद्ध महिलेच्या सोन्याच्या पाटल्या पळवल्या.
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी. बँकेत नेण्याचा बहाणा करून एका महिलेने 80 वर्षाच्या वृद्ध महिलेचा च्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या बाहेर काढायला लावून फसवणूक केली.
मथुराबाई हरिभाऊ मिरजकर (वय 80 राहणार बारंगुळे गल्ली, बार्शी). यांनी बार्शी शहर पोलीस स्टेशन मध्ये या महिलेविरुद्ध फिर्याद दिलेली आहे. मिरजकर यांचा कापड व पिशव्यांचा यांचा व्यवसाय आहे.
त्यांच्याकडे एक लेडीज आली व म्हणाली की बँकेत विधवा महिलांना 40000 हजार रुपये देत आहेत जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर 5000 हजार रुपये द्या असे म्हणत त्या वृद्ध महिलेला ढगे मळा येथील गणपती गणपती मंदिराजवळ नेले.
आणि बँकेतील साहेबांनी जर तुमच्या हातातील ह्या सोन्याच्या पाटल्या बघितल्या तर तुम्हाला ते पैसे देणार नाहीत तर तुम्ही एक काम करा तुम्ही दोन पाटल्या अंदाजे (1 लाख 20 हजार) किंमत असलेल्या काढून माझ्याजवळ द्या म्हणजे तुम्हाला पैसे मिळण्यास मदत होईल. असे सांगून त्या महिलेने आजीकडून दोन पाटल्या कागदामध्ये गुंडाळून घेतल्या व हातचलाखीने दुसऱ्या खोट्या दोन सोन्याच्या पाटल्या त्या आजीच्या हातात दिल्या.
आणि त्या आजी कडून पैसे काढायच्या निमित्ताने दोन रुपये फार्म साठी द्या व फार्म आणून देते असे सांगून त्या महिलेने आजीकडून दोन रुपये घेऊन गेली आणि आजी तिची वाट पाहत होती पण ती महिला परत आलीच नाही.
आखिरकार त्या आजीने हातात दिलेल्या पाटल्या पहिल्या व त्या खोट्या आढळून आल्या अशा पद्धतीने या वृद्ध महिलेच्या पाटल्या फसवेगिरी पद्धतीने चोरून नेल्या चे दिसून आले.