*शहीद वीर जवान गोरख चव्हाण त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; त्यांच्या अर्धांगिनी कडे राष्ट्रध्वज सुपूर्द*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
रातांजन.(ता.बार्शी). पितुरागड (उत्तराखंड) या ठिकाणी वाहन खोल दरी मध्ये कोसळून अपघात झालेल्या वीर जवानावर बुधवारी रात्री रातंजन तालुका बार्शी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी संध्याकाळी बॉर्डर रोडवर ऑर्गनायझेशन मधील वीर जवान गोरख हरिदास चव्हाण (वय 39) यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव शरीर रातंजन येथे आणण्यात आले. त्यानंतर शाळेच्या आवारात रात्री बाराच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वीर जवान गोरख चव्हाण यांनी आपल्या चिमुकल्या मुलांना फोनवर सांगितले की बाळा मी रात्री खाऊ घेऊन येतो आणि आपण भरपूर आल्यावर मज्जा करू आपल्याला आता नवीन घरामध्ये राहायला जायचा आहे असे ते सारखे आपल्या मुलांना व्हिडिओ कॉल द्वारे बोलत असत. आणि मम्मी आजोबाला त्रास द्यायचा नाही असे ते व्हिडिओ कॉल द्वारे आपल्या बाळांना सांगत असायचे. मी दहा तारखेला येतो बाळ रडायचं नाही मी तुला येताना खाऊ घेऊन येतो. चिमुकल्या मुलांच्या कानावर पडले शब्द नाहीसे झाले.
त्यांचे वास्तुशांतीचे स्वप्न अधुरे राहिले त्यांच्या जाण्याने पूर्ण गावावर शोककळा पसरली होती. गोरख चव्हाण हे 2009 च्या तुकडीत वाहन चालक म्हणून सेवेत रुजू झाले होते. गुजरात, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड येथे मालवाहतूक वाहनावर दाखल झाले. सहा महिन्यापूर्वी ते गावी आले होते. व्हिडिओ कॉल द्वारे घराचे बांधकाम पाहत होते. घर प्रवेशासाठी दहा तारखेला येणार होते आणि येताना मुलांना खाऊ आणतो असेच सारखे फोनवर बोलत होते.
त्यांच्या पत्नीला मंगळवारी रात्री अचानक आठ वाजता फोन आला अधिकाऱ्यांनी दुर्घटनेची माहिती दिली आणि त्यांची अर्धांगिनी निशब्द झाली आणि पूर्ण गावावर शोककळा पसरली. त्यांचे सहकारी पेंटर विजय बागुल यांचे पथक सोबत होते रात्री गावातील लोकांनी मोटरसायकल रॅली सह पार्टी वैराग येथून सहा किलोमीटर अंतरावरील रातंजन येथे नेले. पूर्ण ग्रामस्थांनी रस्त्यावर रांगोळी काढलेली होती गोरख चव्हाण यांच्या अंत्यसंस्कारावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
जवानी तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली त्यानंतर त्यांच्या अर्धांगिनी कडे राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला.