*यंदाचा मान्सून वेळेच्या आधी येण्याची शक्यता? हवामान खात्याच्या अंदाजानुसार*

*यंदाचा  मान्सून  वेळेच्या  आधी  येण्याची  शक्यता? हवामान  खात्याच्या  अंदाजानुसार*

बी पी एस राष्ट्रीय न्यूज सोलापूर

 जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

बार्शी.        यंदाचा मान्सून वेळेच्या आधी येण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजानुसार दर्शवली आहे. अंदमान मध्ये 13 ते 19 तर तळ कोकणात 27 मे ते दोन जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले असनी चक्रीवादळ ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने बंगालच्या उपसागराच्या दिशेने वाटचाल करत आहे. या वादळामुळे राज्यात सर्वत्र ढगाळ चे वातावरण आले आहे. अनेक भागात उन्हाचा पारा असल्याचे दिसून येत आहे. हवामान खात्याने मान्सून कधी दाखल होईल हे दर्शविले आहे. दरवर्षी अंदमानमध्ये पाऊस 22 मे पर्यंत दाखल होतो मात्र यंदा मान्सून 13 मे ते 19 मे च्या दरम्यान म्हणजेच वेळेच्या अगोदर दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजा नुसार दर्शविले आहे. त्यानंतर 20 ते 26 मे पर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे तर कोकणात 27 मे ते 2 जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याच्या विभागाने दर्शवली आहे.

यापूर्वी जिल्हा अधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांनी मान्सूनपूर्व आराखड्याची नियोजन सर्व प्रशासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आले आहेत जेणेकरून सर्वसामान्य जनतेला अतिवृष्टी (पावसाचा) त्याचा त्रास होता कामा नये असेही श्री शंभरकर यांनी सांगितले आहे.