*शेगाव गजानन महाराज पालखीचे भगवंत बार्शी मध्ये पोलीस प्रशासन व पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी टीमच्या बंदोबस्तात उत्साहात आगमन*

*शेगाव  गजानन  महाराज  पालखीचे  भगवंत  बार्शी  मध्ये  पोलीस  प्रशासन व  पोलीस  जाणीव  सेवा  संघ  बार्शी  टीमच्या  बंदोबस्तात  उत्साहात  आगमन*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

दि.16-07-2022            शेगाव श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे भगवंत नगरी बार्शी मध्ये अतिशय उत्साहात आगमन झाले.

पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रवी सर फडणीस यांच्या आदेशानुसार व बार्शी शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी बंदोबस्त करण्यात आला. तसेच पोलीस अमलदार रमेश माने, श्रीहरी घोडके, संगम वडले, संताजी अलाट, अमोल वाडकर, अमोल माने, सुनील सरडे, अजित वाघमारे, विठ्ठल मिसाळ, दीपक नकाशे, मारुती शेलार, चव्हाण आदी उपस्थित होते.

गजानन महाराज पालखी सकाळी 06:00 वाजता भगवंत बार्शी नगरीतील भाविक, पोलीस प्रशासन व पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी टीमच्या नियोजनाने श्री रामेश्वर मंदिर कुरूडवाडी रोड येथे सकाळी 08:30 वाजता आगमन झाले.

व तेथून सकाळी ठीक 10:00 वाजता श्री भगवंत मंदिराकडे प्रस्थान झाले. यावेळी बार्शीतील व बार्शी तालुक्यातील भाविकांना पालखीचे दर्शन व्यवस्थित रित्या व्हावे याकरिता पोलीस प्रशासन व पोलीस जाणीव सेवा संघ टीमच्या वतीने बंदोबस्त करण्यात आला. कसल्याही प्रकारची चोरी-चपाटी व अनुचित प्रकार घडू नये तसेच कोणालाही दर्शन घेताना त्रास होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली.

ह्या 53 व्या गजानन महाराज पालखी सोहळा बार्शी, मध्ये 800 ते 1000 वारकऱ्या समवेत आगमन झाले. पालखीतील वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी चहा व नाश्त्याचे स्टॉल लावण्यात आले होते.

 पोलीस जाणीव सेवा संघाने मंदिरातील गाभाऱ्यात व पालखी जवळ कडकड बंदोबस्त केला. यामध्ये पोलीस जाणीव सेवा संघाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बार्शीतील भाविकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कसल्याही प्रकारची हेळसांड न होता पालखीचे दर्शन घेतले. या पालखीच्या बंदोबस्तासाठी पोलीस जाणीव सेवा संघाचे विभाग प्रमुख- उमेश आणेराव, उपविभाग प्रमुख- समाधान विधाते, तालुका संपर्कप्रमुख- सम्मेद तरटे, तालुका कार्याध्यक्ष- अजय दराडे, शहर कार्याध्यक्ष- रमेश डोंगरे, संघटक- अमोल बुके, सह संघटक- सागर काशीद, भगवान लोकरे दत्ता माने, गणेश सातारकर

तसेच, बार्शी तालुका अध्यक्ष- सुप्रिया काशीद, संपर्कप्रमुख रूपाली विधाते, शहर अध्यक्ष- मीनाक्षी साळुंखे, उपाध्यक्ष- कौशल्या राऊत, कार्याध्यक्ष- राधा घोंगाने, संघटक- पूजा सातारकर प्रमुख सदस्या- सारिका आणेराव, सुनिता मस्के आदी उपस्थित होते.