*यंदाच्या गणेशोत्सवात अखेरचे पाच दिवस ध्वनिवर्धकांना परवानगी: शिंदे सरकार*

*यंदाच्या  गणेशोत्सवात  अखेरचे  पाच  दिवस  ध्वनिवर्धकांना  परवानगी:  शिंदे  सरकार*

बी.पी.एस. राष्ट्रीय  लाईव्ह  न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी)

पुणे.   यंदाच्या गणेशोत्सवात अखेरचे पाच दिवस ध्वनिवर्धकांना रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. न्यायालयाचे काटेकोरपणे पालन करून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोणत्याही गणेश मंडळाला याची अडचण येणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा सांगितले.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तालयात मुख्य उपस्थितीत शहरातील गणेश उत्सवाचे प्रमुख मंडळे बोलवण्यात येऊन बैठक झाली. यावेळी जय गणेश व्यासपीठाचे श्रीकांत शेटे, प्रसाद कुलकर्णी, नितीन पंडित, विकास पवार, पियुष शहा व आदी उपस्थित होते. गणेश उत्सवाचे मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते.तसेच, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिंदे यांना निवेदनपत्रे दिले.आणी बैठक झाल्यानंतर शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पुणे हे गणेश उत्सवाचा वारसा आहे. या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून अनेक राज्यातून गणेश मूर्तीचे कला कौशल्यच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम, डेकोरेशन पाहायला मिळते. यामध्ये मंडळाच्या काही विविध प्रकारच्या मागण्या होत्या त्या बैठकीमध्ये विषयासहित मांडण्यात आल्या. तसेच गणेश मंडळांना कसल्या प्रकारची अडचण येणार नाही व यामध्ये जिल्हाधिकारी सविस्तरपणे लक्ष घालतील असेही ते म्हणाले. न्यायालयाच्या नियमांचे पालन करून विसर्जन, मिरवणूक काढून व्यवस्थित रित्या कार्यक्रम पार पाडू आणि कोणत्याही प्रकारची मंडळांना अडचण येणार नाही याची सर्वांनी खात्री घ्यायची आहे असेही ते म्हणाले.

सर्व मंडळाचे निवेदन व विनंती स्वीकारून गणेश उत्सवाला अखेरचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्ववनिवर्धकांना परवानगी दिली आहे. यामध्ये कोणीही वादावाद किंवा नियमाचे उल्लंघन केल्यास नक्कीच पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करतील. यामध्ये पोलिसांनी सुद्धा जनतेच्या कडे लक्ष द्यावे जेणेकरून कोणीही हुतमात मांडू नये, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.