महिमा बहुउदशीय सामाजिक संस्था नागपूर च्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली .
महिमा बहुउदशीय सामाजिक संस्था नागपूर च्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त गरजू महिलांना संस्थे कडून ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
Bps live news . Network
नागपूर : भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेचे नाव सावित्रीबाई फुले . महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाई फुले त्यांच्या जयंतीला बालिका दिन असेही म्हटले जाते.
विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यासारख्या महत्वाच्या कार्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले.
स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मगळवारी 3 जानेवारी रोजी नागपूर शहरभरात उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, विविध संघटना, सरकारी कार्यालये, राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
त्याचबरोबर महिमा बहुउद्देशिय सामजिक संस्था नागपूर यांच्यावतीने संस्थेच्या कार्यालय येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिमा बहुउद्देशिय सामाजिक संस्था द्वारे गरजू महिलांना ब्लेंकेट सुद्धा वितरण करण्यात आले .
तसेच महिलांना शासनाच्या विविध योजनाची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमला संस्थेच्या अध्यक्ष सौं. शीतल अमित पाटील प्रामुख्याने उपस्थित होत्या . तसेच श्री.भास्कर पराते (अध्यक्ष. परमात्मा एक सेवक संस्था )
सौं. ममता शेखर सायम (अध्यक्ष. आस्था बहुउदशीय संस्था ), सौं विशाखा जोशी (HOD धरमपेठ कॉलेज ), शशिकला बावणे (लायब्रीयन शामा प्रसाद मुखर्जी वाचनालय ) तसेच संस्थेचे पदाधिकारी शामला नायडू , नंदा करनेवार, राणी कळमकर, वर्षा पाटील, रेवती चारकोल , समीक्षा वारके , महिमा पाटील इत्यादि संस्थेच्या पदाधिकारी सदस्य व बहुसंख्यांने महिला उपस्थित होत्या .
तसेच सदर कार्यक्रमला 60 ते 70 लाभार्थिनी आपला सहभाग नोंदवला.