*लोकांना भासवून पैसे चोरणारी टोळी जेलबंद करत; बार्शी शहर पोलिसांची दमदार कामगिरी.*

*लोकांना भासवून पैसे चोरणारी टोळी जेलबंद करत; बार्शी शहर पोलिसांची दमदार कामगिरी.*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

बार्शी शहर पोलीस ठाणे 392/2022 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल गुहेतील फिर्यादी यांनी दिनांक 15-6-2022 रोजी बजरंग नागनाथ जाधव वय 70 वर्षे धंदा व्यवसाय राहणार 3515 राऊळ गल्ली बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद दिली होती की यांनी तेलगिरणी चौकातील मिरगणे कॉम्प्लेक्स शेजारी असलेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेत एफडी वर कर्ज काढण्यासाठी गेले असता त्यांनी तिथून पन्नास हजार रुपये शंभर रुपये दराचे दहा हजार रुपये चे पाच बंडल असे रोख रक्कम घेऊन येत असताना फिर्यादीच्या समोरून दोन अनोळखी व्यक्ती आले त्यातील एक व्यक्तीने फिर्यादीचे दंडास धक्का देऊन तुमचे पैसे पडले आहेत असे म्हणाल्याने फिर्यादीने गाडीवरून उतरून गेटच्या आत येऊन पाहिले असता फिर्यादीत शंभर रुपयाची एक नोट व 20 20 च्या नोटा पडलेल्या दिसल्या सदर नोटा घेण्यासाठी फिर्यादी खाली वाकले व तेथील नोटा घेऊन आपल्या मोटर सायकल इकडे आल त्यावेळी फिर्यादीची मोटरसायकली ला पुढील बाजूला अडकवलेली कागदी पिशवी पाहिली असता ती तिथे दिसली नाही त्यात 50 हजार रुपये रोख रक्कम त्यामधील शंभरच्या दराने पाच बंडल सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची एफ डी आर पावती केळकर पतसंस्थेचे पासबुक असे साहित्य एकूण 50 हजार रुपये असे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादी संमनती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेले आहेत.

दि.2-11-2022 रोजी लोकांना बँक /एटीएम जवळ थांबून तुमचे पैसे पडले आहेत असे भासवून खाली नोटा टाकून सदर लोकांची फसवणूक करणारी गाडीला किंवा गाडीतील पैशाची बॅग पळवून नेणाऱ्या लोकांची गोपनीय द्वारे मिळालेल्या बातमी प्रमाणे केलेली कारवाई आरोपी राजेश रामलाल साळुंखे वय 60 राहणार शुक्रवार पेठ खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर, बन्सी उमाजी भोसले वय 58 राहणार चिंचोडी पाटील तालुका जिल्हा अहमदनगर, आकाश हुकूम बडगुजर वय 35 राहणार नवा मोंढा परळी तालुका परळी जिल्हा बीड, जयेंद्र दिलीप परमाळ वय 27 राहणार माळीवाडी तालुका जिल्हा यांना तेल गिरणी चौक मिरगणे कॉम्प्लेक्स जवळ ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच अशा प्रकारचे गुन्हे पंढरपूर टेंभुर्णी सोलापूर ग्रामीण पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद तसेच बीड जिल्ह्याच्या हद्दीत चोरी केल्याचे कबुली दिली आहे सह आरोपी बार्शी सबजेलमध्ये कोठडीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री शिरीष देशपांडे, मा.पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री आप्पासाहेब मांजरे, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, सपोकौ अमित वरपे पोलीस हेडकॉन्स्टेबल/ 304 शैलेश चौगुले पोलीस नाईक / 11 62 मनीष पवार पोलीस नाईक / 912 वैभव ठेंगल पोलीस कॉन्स्टेबल / 1748 ज्ञानेश्वर घोंगडे पोलीस कॉन्स्टेबल / 787 अविनाश पवार पोलीस कॉन्स्टेबल/ 856 अर्जुन गोसावी पोलीस हेड कॉन्स्टेबल /1974 सचिन देशमुख पोलीस कॉन्स्टेबल /2111 अंकुश जाधव यांनी केली.