राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता कायम ठेवन्यासाठी प्रथम संविधानाचा आदर व्हावा -सभापती संजय डांगोरे.

1.

काटोल:- भारत देश हा बहु धर्मीय बहुपंथीय बहुजातीय असल्याने याची सर्व अखंडता आणि एकात्मता टिकून ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांची असून त्याकरीता भारत देशाच्या विकासासाठी संविधानाप्रमाने मार्गक्रमन व्हावे.संविधानावर कुठलाही घाला येणार नाही, याची काळजी आपण घेऊया असे विचार काटोल पंचायत समीतीचे सभापती संजयभाऊ डांगोरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सप्ताहाचे उद्घाटक म्हनुन व्यक्त केेले. काटोल पंचायत समीती द्वारा काटोल तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधे दिनांक 9 आगस्ट ते 14 आँगस्ट 2023पर्यत विवीध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

माजी सैनिकांचा सन्मान, व्रुक्षारोपन ,दिप प्रज्वलन,आदी कार्यक्रमासोबत प्रतेक गावची माती दिल्ली येथे पोहचविल्या जानार आहे. देशभावना जागृत ठेवुन देशाप्रती शपथ सुद्धा दिल्या गेली आहे. पंचायत राज अभीयानात अग्रेसर ठरलेल्या काटोल पंचायत समीती मधे संपन्न झालेल्या कार्यक्रमात सभापती संजय डांगोरे ,खंडविकास अधीकारी दिपक गरुड, उपसभापती निशीकांत नागमोते,धम्मपाल खोब्रागडे,अनुराधा खराडे,चंदा देव्हारे,आदी पंस सदस्य,विस्ता अधीकारी,तथा कर्मचारी बुसंख्खेंने उपस्थीत होते.