काल अवकाळी पावसात विज पडुन दोघांचा दुर्देवी मृत्यु
1.
दि.१२ में रविवार ला मौजा आलागोंदी ता.काटोल येथील शिवारात विज पडुन दोघे जण मृत्युमुखी पडले. उत्तमराव पंचभाई, रा. उदापुर ता.वरुड यांचेतर्फे मौजा आलागोंदी येथे वाघोबा देवस्थान मध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विविध ठिकाणांहून अंदाजे ५० लोकं उपस्थित होते, अचानक दुपारी २.३० वाजताचे सुमारास विजेच्या कडकडासह वादळी पाऊसाला सुरुवात झाली, पावसामुळे भागवत दौलत भोंडवे,वय ५५ वर्षे रा.उतखेड ता.वरुड जि.अमरावती व जयदेव नभु मनोटे,वय ६० वर्षे ,रा.कला मगोना ता.जि.बैतुल पळसाच्या झाडाखाली बसले असता अचानक विज पडुन दोघेही मृत्युमुखी पडले,सदर घटनेची माहीती मिळताच नागपुर जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच तहसीलदार काटोल, पोलीस उपनिरीक्षक कोंढाळी त्रिपाठी साहेब यांना माहीती दिली त्यानुसार त्यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच धवल देशमुख
पोलीस.उ.नि.कोंढाळी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी शव काटोल येथे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले, शवविच्छेदन करण्यासंबंधी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.दिनेश डवरे यांना चंद्रशेखर चिखले यांनी सुुचित केले.
घटनास्थळी बंडुभाऊ राठोड, आलागोंदी पोलीस पाटील सौ.उषा घोरमाडे,वाई पोलीस पाटील राजुकराळे, सरपंच अशोक तागडे, प्रमोद घोरमाडे,संजय डफर, संजय मानकर, श्रीकृष्ण मानकर, राजु पंचभाई, बाबा सहारे, मनोहर हेलोंडे, पुरुषोत्तम कोहळे, विलास नेहारे, होमेश्वर धोतरकर तसेच कोतवाल योगेश्वर वैद्य यांनी सहकार्य केले, मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.