शेतकरी जगला तरच देश जगेल- सभापती संजय डांगोरे

शेतकरी जगला तरच देश जगेल- सभापती संजय डांगोरे

काटोल प्रतिनिधी:- काटोल पंचायत समितीमध्ये क्रुषी दिनी शेतकऱ्यांचा सत्कार, एक जुलै ला स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी काटोल पंचायत समिती सभागृहामध्ये शेतकरी दिनाचे औचित्य साधून प्रगतीशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन तथा त्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती संजय डांगोरे यांनी शेती आणि शेतकरी जगला तरच देश जगेल .शेतकऱ्यांना जगवण्याची जबाबदारी सर्वांची आहे . त्यासाठी मदत शासनातर्फे शेतकऱ्यांना नक्कीच व्हायला पाहिजे ,तेव्हाच आपला भारत देश सुजलाम- सुफलाम नक्कीच होईल असे विचार काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी व्यक्त केले .  

यावेळी प्रमुख पाहुणे धरतीपुत्र ,साहित्यिक अनंतजी भोयर तथा डॉक्टर कैलास कडू उपस्थित होते. काटोल पंचायत समितीचे उपसभापती निशिकांत नागमोते, खंड विकास अधिकारी रामदासजी गुंजरकर, पंचायत समिती सदस्य अरुण उईके ,सदस्या लताताई धारपुरे ,अल्पभूधारक प्रगतिशील शेतकरी रामभाऊजी मोहोड,खडकाळ शेतीमध्ये उत्पादन करणारे प्रकाशजी मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. स्वर्गवासी माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये शेतीच्या संदर्भात फार मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यात आली त्यांच्या या जयंतीदिनी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये काटोल पंचायत समितीमध्ये अनेक उपक्रम राबवण्यात आले. पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्री अनंत भोयर यांनी सेंद्रिय शेती आणि परंपरागत शेतीच्या संदर्भात अनमोल असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले तर प्राध्यापक कैलास कडू यांनी शेती विषयी येणारे अडचणीवर मात कशी करावी याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे यावेळी शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.                    

काटोल पंचायत समिती तर्फे एक जुलै ते सात जुलै पर्यंत कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या समर्पणाचा आणि राज्यभरातील कृषी पद्धतींना चालना देण्यासाठी शेतकऱ्यांचा योगदानाचा सन्मान करण्यात काटोल पंचायत समिती अग्रेसर आहे. सप्ताभर प्रत्येक तालुक्याच्या ठिक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे . कार्यक्रमाचे संचालन विस्तार अधिकारी उत्तम झेलगोंधे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीणा बोर्डे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी ते करिता काटोल पंचायत समितीचे तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. श्री थोटे ,श्री भक्ते ,श्री नेहारे यांच्या पुढाकारानेपंचायत समिती परिसरामध्ये वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.