"तेजोनिधी सेंटर फॉर डेव्हलपमेंट" संस्थे तर्फे श्रीराम महाविद्यालय ,सोनेगाव येथे संस्थेच्या बालसखा प्रकल्पा अंतर्गत "आनंदम बाल शिबीर" सम्पनं !

तेजोनिधी सेंटर फॉर सोशल डेव्हलपमेंट संस्थे मार्फत विविध क्षेत्रात प्रमुख प्रकल्प राबवण्यात येतात याच श्रुंखलेतील बालगोपालां- साठी "बालसखा" हा प्रकल्प राबवण्यात येतो. बालसखा प्रकल्पा अंतर्गत नागपूर जिल्यातील कळमेश्वर तालुक्यामधील सोनेगाव येथील श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वर्ष 6 ते 14 पर्यन्त च्या विद्यार्थ्यांसाठी " आनंदम बाल शिबीराचे" आयोजन करण्यात आले. 
 


दि 04 मे 2022 रोजी शाळेत सरस्वती पूजन करून शिबीराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. व शिबिराला सुरवात झाली. तेजोनिधी संस्थेच्या वतीने शिबीराच्या प्रशिक्षणा साठी 4 प्रशिक्षकांची निवड करून प्रशिक्षकां मार्फत विद्यार्थ्यांना योगा, सूर्यनमस्कार, शुद्ध लेखन, चित्रकला, हस्तकला, नृत्य, श्लोक पठण,मेहंदी, रांगोळी, विविध सांघिक मैदानी खेळ तसेच शाळा परिसरात शिक्षण संस्थे मार्फत प्रसिद्ध केलेली महत्त्वपूर्ण माहितीचे अवलोकन करून; माहिती सविस्तर स्वतः जवळ नोंद करणे अश्या प्रकारच्या उपक्रमांची मेजवानी विदयार्थ्यांना देण्यात आली.

आनंदम शिबीरात कळमेश्वर पंचायत समिती सर्कल मधील सोनेगाव,लिंगा,पोही,उबगी,खापरी, चांम्पा, कोहळी, या गावातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 10 दिवसांच्या शिबीरात मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्तकला स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा, तसेच प्रश्न मंजुषा अश्या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यात आला. या स्पर्धांचे निकाल लावून त्यात प्रथम व द्वितीय पारितोषिक विजेत्यांची निवड करण्यात आली.विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिका साठी  सांस्कृतिक गीतांवर आधारित 5 नृत्ये बसविण्यात आलीत व त्यांचे सादरीकरण झाले. ज्या मुळे विद्यार्थ्यांनाशिबीरात आनंद निर्माण झाला.शिबीराची रूपरेषा व नियोजना साठी तेजोनिधी संस्थेचे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंकज गौतम यांनी श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय च्या मुख्याध्यापिका श्रीमती. सि. एस. खुसपरे यांच्या सोबत शाळेची प्रत्यक्ष पाहणी व चर्चा करून सुक्ष नियोजन केले.

शिबीर ग्रामीण भागात होणार असल्या मुळे इतर गावातील विद्यार्थ्यां साठी मोफत बस, उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता शिबिरार्थीं साठी पोटभर अल्पोपहार, थंड पाणी, तसेच उपक्रमा साठी शाळेचा मुख्य हॉल मोफत देण्याची व्यवस्था ही श्रीराम विद्यालया च्या वतीने करण्यात आली. अश्या उत्स्फूर्त व प्रसन्न वातावरणात 10 दिवसाच्या शिबिराचा समारोप दि.14 मे 2022 रोजी शिबिरार्थीच्या पालकांच्या व विशेष अतिथीच्या उपस्थितीत सम्पनं झाला. समारोपीय कार्यक्रमात प्रशिक्षकांनी प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपस्थितांच्या समक्ष सादर केली. स्पर्धेतील विजेत्या शिबिरार्थ्याना तेजोनिधी संस्थे तर्फे बक्षिस व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते  देण्यात आले तसेच शिबीरात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी श्री साई बहुउद्देशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मेघराजजी ताजणे सर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. ताजणे सरांनी तेजोनिधी संस्थेला नियमीत असे प्रशिक्षण शिबीर परिसरातील सर्व शाळाना मिळून घेण्याचे आवाहन व विनंती केली ज्या मुळे सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांच्यात शहरी भागातील विद्यार्थ्यां प्रमाणे स्पर्धा निर्माण होईल असे मत मांडले. मुख्य अतिथी तेजोनिधी संस्थेच्या मार्गदर्शन समितीच्या सदस्य डॉ. अमृता इंदुरकर यांनी शिबिरार्थी व पालकां सोबत संवाद साधत तेजोनिधी संस्थेच्या उपक्रमा संदर्भ माहिती व शिबीरा बद्दल चे मत जाणून घेत नवीन अध्यापन पद्धती चा अवलंब शिक्षकांनी करावा असे आव्हान केले. 

कार्यक्रमा च्या प्रास्ताविकात तेजोनिधी संस्थेचे प्रकल्प समन्वयक श्री. अभय देशमुख यांनी सर्व 10 दिवसाचे शिबीराचे नियोजन व उपक्रमा संदर्भात प्रास्ताविकातून माहिती दिली. डॉ. गायत्री ताजणे संचालिका श्री साई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, श्री. रमेश सालोडकर गट शिक्षण अधिकारी, श्री. राहुल वानखडे तज्ञ मार्गदर्शक, श्री. खांडेकर माजी पोलीस पाटील सोनेगाव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. खुसपरे मॅडम यांनी सुद्धा शिबिरार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सौ. अनिता वक्कलकर  व सौ. सारिका देशमुख  यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. समृद्धी काळे मॅडम यांनी केले.