जगाला युद्धाची नाही तर बुद्धाच्या वीचाराचीच गरज..दिगांबर डोंगरे
1.
काटोल:- जगाला शांती अहिंसा प्रेम मानवी दुखः मुक्तीचा कल्याणकारी संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2885वी जयंतीनिमित्य काटोल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील आंबेडकर पुतळ्याजवळ वार्षिक पौर्णिमा उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व न प काटोल चे माजी सभापती दिगांबर डोंगरे होते तर प्रमुख उपस्थितीत काटोल पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक पूनम कोरडे. वार्षिक पौर्णिमा उत्सव समिती अभियानाचे संयोजक अनंतराव सोमकुवर.प्रा. अरुण सोमकुवर,प्रा.रमेश येवले,प्रा.सतीश ढोके ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामराव पाटील बोधाचार्य गुलाबराव शेंडे समता सैनीक दलाचे काटोल तालुका प्रमुख प्रफुल्ल सोमकुवर हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक पूनम कोरडे व दिगांबर डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थितांच्या हस्ते माल्यार्पन करून मेणबत्ती द्वीप प्रज्वलित करून तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले, त्यानंतर बोधाचार्य गुलाबराव शेंडे यांनी पंचशिल त्रिशरन बुद्ध धम्म संघ वंदना ग्रहण करून देवून वैशाख पौर्णिमा म्हणजेच सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे महत्व सांगितले तर प्रा.अरुण सोमकुवर ,प्रा.रमेश येवले, प्रा.सतीश ढोके, रामराव पाटील पोलीस अधिकारी पूनम कोरडे यांनीही तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी माहिती दिली.
अध्यक्षीय विचार व्यक्त करताना दिगांबर डोंगरे म्हणाले की आज जगात युद्ध सद्रुष्य परिस्थिती निर्माण होत आहे. जगाच्या पाठीवर अनेक संकट निर्माण होत असुन माणुस माणसाचा शत्रू बनत आहे. देशा देशात राज्या राज्यात जाती जातीत धर्मा धर्माधर्मात विषमतेची जहर ओतल्या जात आहे. माणुस आपला माणुसकीचा धर्म विसरून अधर्माकडे वळत आहे त्यामुळे प्रत्येक देशातील शांतता धोक्यात येत चालली आहे, म्हणजेच युद्ध सद्रुष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये जगाचे फार मोठे नुकसान होण्याचे नाकारता येत नाही या नुकसानीतुन वाचायचे असेल तर भगवान गौतम बुद्धाचेच विचार स्वीकारणे गरजेचे आहे. असे मत दिगांबर डोंगरे यांनी व्यक्त केले.
यावेळेस अशोकराव बागडे, सुरेश देशभ्रतार, पांडुरंग खोब्रागडे ,जिवन वाहने, राजेंद्र गायकवाड, श्रीकृष्ण ढोके, दिगांबर भगत, सुरेखा येवले ,प्रधन्या डोंगरे ट्रोफिक पोलीस चेतन ठाकरे व पोलीस कर्मचारी व बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी ढोके यांनी तर प्रास्ताविक अनंतराव सोमकुवर यांनी तर आभार आकाश मेश्राम यांनी मानले.