मध्यप्रदेश शासनच्या नावाखाली बनावट रॉयल्टीच्या कागदावर नागपूर जिल्ह्यात वाळू तस्करी !!
मध्यप्रदेश शासनच्या नावाखाली बनावट रॉयल्टीच्या कागदावर नागपूर जिल्ह्यात वाळू तस्करी.
https://bpslivenews.in
नागपुर शहर पोलिसांनी भोपाळ (मध्य प्रदेश) येथून सराईत गुन्हेगारला अटक केली.
प्रतिनिधि:वाहिदशेख(ब्यरो रिपोर्टर) https://bpslivenews.in
नागपूर : जिल्ह्यातील काही वाळू व्यावसायिक सिंडिकेट तयार करून अवैध वाळू व्यवसाय चालवत आहेत.
अवैधरित्या वाळू उत्खनन करून रॉयल्टीची बनावट कागदपत्रे देणाऱ्या एका व्यक्तिला मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून अटक करून आंतरराज्य टोळीचा नागपूर पोलिसांनी शुक्रवारी पर्दाफाश केला.
वाळू माफिया अशा बनावट कागदपत्रांचा वापर करून आपले अवैध धंदे सुरळीतपणे चालवून शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत होते.
हे खूप मोठे रॅकेट असून नागपूर जिल्ह्यातील वाळू तस्करही या कारवायात सहभागी असून ते आरोपींच्या संपर्कात होते, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. राहुल खन्ना असे आरोपीचे नाव आहे.
राहुल खन्ना हे महाराष्ट्र जिल्ह्यातील वाळू माफियांच्या संपर्कात होते.
रॅकेटच्या कार्यपद्धतीची माहिती देताना सीपी अमितेश कुमार म्हणाले की, नागपूर जिल्ह्यातील वाळू तस्कर जिल्ह्यातून अवैधरित्या वाळू उत्खनन करत होते, चोरीची वाळू सुरळीतपणे नेण्यासाठी खन्ना यांनी तयार केलेल्या बनावट रॉयल्टी कागदाचा वापर करत होते. नागपूर जिल्ह्यासह वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर येथील वाळू माफियाही खन्ना यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
बनावट कागदपत्रांच्या डेमोने रहस्य उघड केले
सीपी म्हणाले की, स्थानिक गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर, गुन्हे शाखेने राहुल खन्ना याला भोपाळ (मध्य प्रदेश) येथून अटक केली. या प्रकरणातील तक्रारदार, फ्रेंड्स कॉलनीतील रहिवासी संतोष बापूराव गायकवाड(33) आहे.
सीपी अमितेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, गायकवाडने पोलिसांसमोर रॅकेटचा डेमो दाखवला होता, त्याने मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील वाळूघाट येथून वाळू उत्खननासाठी रॉयल्टी पेपर आणि ट्रान्सपोर्ट परमिट देण्यासाठी डिजिटल पेमेंट द्वारे PhonePe वरून 9900 रुपये खन्नाला हस्तांतरित केले होते .
गायकवाड यांच्या मागणीवरून खन्ना यांनी कागदपत्रे तयार करून गायकवाड यांना व्हॉट्सअॅपवर पाठवली. नागपूर शहर व जिल्ह्यातील वाळू तस्करांची नावे शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी त्याची जमुन चौकशी करत आहेत.