10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्यावर पुढे काय ? या विषयावर प्राचार्य नितेश कराळे गुरुजी यांचा मार्गदर्शन कार्यक्रम सावनेर येथे आयोजित करण्यात येत आहे.
Delhi91bps live news network
प्रतिनिधी - वाहिद शेख
सावनेर : (10 जून) दहावी आणि बारावी परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन स्कूल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हेतू वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचार्य नितेश कराळे गुरुजींचा कार्यक्रम 11 जून रविवारला सकाळी 11 वाजता सावनेर बस स्टॉप च्या बाजूला प्रसंग सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित करण्यात आलेलं आहे .
या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक सावनेरचे पोलीस निरीक्षक मानकर साहेब तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी सावनेर , संयोजक सतीश साष्टँनकर , लेखक नरेंद्र माहूरतळे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल.
सावनेर क्षेत्रामध्ये निःस्वार्थ काम करणारे सामाजिक कार्यकर्ता किरण जयस्वाल , हितज्योती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड , पत्रकार राहुल सावजी (दै.पुण्यनगरी), पत्रकार मनोहर घोळसे (सकाळ) , पत्रकार दिलीप घोरमाडे(टीवी व युट्यूब चॅनल) यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल.
या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता मुंबईचे धनंजय शिंदे , सोलापूर जिल्ह्यातील बाबासाहेब चव्हाण , चंद्रपूर जिल्ह्यातील मयूर रायिकवाड , नागपूर जिल्ह्याचे जगजीत सिंग , तसेच नागपूर येथील देवेंद्र वानखडे सर , गणेशजी रेवतकर , संजय राऊत , गजानन चौधरी, मीडिया प्रभारी बंडूभाऊ चौरागडे , कळमेश्वर तालुक्यातील अतुल श्रीखंडे हे सर्व सामाजिक कार्यकर्ताचा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहील.
या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थींना व पालकांना उपस्थित राहण्याची अपील कार्यक्रमाचे आयोजक तसेच सामाजिक कार्यकर्ता संजय टेंभेकर, जामुवंत वारकरी द्वारा करण्यात आलेलं आहे.