करिअर मार्गदर्शन शिबिर 10 वी - 12 वी नंतर काय ?

करिअर मार्गदर्शन शिबिर 10 वी - 12 वी नंतर काय  ?

___________________________________________

करिअर मार्गदर्शन शिबिर 10 वी - 12 वी नंतर काय ? 

___________________________________________

(Delhi91 bps live news Network)

ब्युरो रिपोर्टर- वाहिद शेख 

नागपूर : (2 जून) , करिअर म्हणजे केवळ आर्टस्‌ कॉमर्स किंवा बी.ई, एम.बी.बी.एस. नव्हे तर व्यक्तिच्या जीवनात प्रगतीच्या संधी असणारा व्यवसाय असतो. यशस्वी करिअर घडवण्यासाठी अनेक घटक महत्वाचे असतात. यात शिक्षण, आपला दुष्टीकोण, आपल्यातली कौशल्ये, सवयी, कुवत हे सारे घटक महत्वाचे असतात. केवळ दहावी, बारावीच्या मार्कवर करिअरची दिशा न ठरवता व कशाला जास्त संधी आहेत असा विचार न करता आपली आवड व कुवती नुसार करिअर निवडला तर त्यात यशस्वी होता येईल व पैसा प्रसिद्धी समाधान आनंद सर्व काही मिळते.

करिअर निवडीसाठी शिक्षण क्षेत्र महात्वाच ठरत.त्यामुळे दहावी किंवा बारावी जिथे आपल्याला निर्णय घ्यावयाचे असतात तिथे स्वत:च अवलोकन किंवा मुल्यमापन/अभिक्षमता व बुद्धीमत्ता मापन चाचणी करणे महत्वाचे असते. कोणते करियर योग्य ठरेल हे तपासण्यासाठी विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक मोजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध चाचण्या आहेत. अनेक मानसोपचार तज्ज्ञ या चाचण्या करतात. बुद्ध्यांक अचूक नसला तरी त्याचा मार्गदर्शनासाठी फार उपयोग होऊ शकतो. या प्रकारच्या चाचण्या घेऊन मार्गदर्शन करणार्‍या अनेक संस्था आहेत.

नागपूर शहरात दिनांक 1जुलै रोजी (शनिवार) दुपारी 3 वाजताच्या दरम्यान नागपूर स्थित महिमा बहुउदेशीय सामाजिक संस्था व आदिवासी निराधार महिला बहुउदेशीय सामाजिक संस्था आणि चिटनविस ट्रस्ट याचा संयुक्त विद्यमाने 10वी आणि 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याकरीता करियर मार्गदर्शन शिबीर तसेच त्यांचा अभिनंदन कार्यक्रम टेंमरिड हॉल , चिटनवीस सेंटर , सिव्हील लाईन नागपूर येथे आोजित करण्यात आला .

यावेळी उपस्थित मान्यवरांद्वारे विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन व अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक अतुल सबनीस , सि.पि. अँड बेरार हायस्कूलचे वरिष्ठ प्राध्यापक अनिल शिवणकर सर , वरिष्ठ वकील व माजी बाल कल्याण समिती सदस्या बोरकुटे मॅडम , शैली गंभीर काउन्सलर व लाईफ स्किल कोच , अखिल भारतीय स्थानीय स्वराज संस्थाच्या माजी विध्यार्थी माधुरी मॅडम या सर्वांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. तसेच सदर कार्यक्रमाला महिमा बहुउदेशीय संस्था च्या संस्थापक अध्यक्ष सौं शीतल पाटील , आदिवासी निराधार महिला बहुउदेशीय संस्था च्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती बबिता धुर्वे आणि चिटणवीस ट्रस्ट ची संपूर्ण टीम यांचे सहकार्य लाभले.

सर्वे मुलांना एकत्रित करण्यात निशा ठाकूर, वैशाली फरकानडे, कविता पांडे, सोशल मीडिया टीम रेवती चारखोल , प्रियंका सरोदे , निखिल , महिमा , समीक्षा , या सर्वांचा सहकार्य केले . करियर काउन्सलिंग मार्गदर्शन शिबिरात खालील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

1. "आपल्या करिअरमध्ये सफलतेचा मार्गदर्शन"

2. "स्वप्न जगायला करिअर काउंसलिंगची महत्त्वाची गरज"

3. "व्यावसायिक आकलनाच्या मार्गदर्शनाने उच्च शिक्षणाची निवड कसे करावी?"

4. "विद्यार्थ्यांना प्रभावीपणे संचालित करणारा करिअर योजनेचा तयार करण्याचा मार्गदर्शन"

5. "कशाप्रकारे स्वतंत्र उद्योजक व्हावे?"

6. "करिअरमध्ये सक्षमतेची विकासाची महत्त्वाची गरज"

7. "विद्यार्थ्यांना संघटित करणारा अध्ययन योजना व व्यावसायिक निर्धारण कसे करावे?"

8. "करिअरमध्ये स्वयंप्रेरणा कसे जोडावी?"

9. "आपल्या करिअरमध्ये संतुष्टीचे मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन"

10. "विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करण्यासाठी करिअर काउंसलिंगचे महत्त्व"

मार्गदर्शन शिबिरात 10 वी आणि 12 वी मध्ये कमी पर्सेंट नी पास झालेल्या विद्यार्थांना त्यांचे मनोबल व प्रतिभा वाढविण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र व स्कूल बॅग देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सदर मार्गदर्शन शिबिरात दोनशेहून विद्यार्थी आणि पालक यांनी आपली उपस्थिती दर्शविली . याबरोबर सर्व कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पाडण्यात आले .