जागतिक महिलादिना निमित्त सावनेर येथे लोकरंग कलाश्रृंगार गृह तर्फे अस्तित्व (हौसलो की उडान) 2024' महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले.

जागतिक महिलादिना निमित्त सावनेर येथे लोकरंग कलाश्रृंगार गृह तर्फे  अस्तित्व (हौसलो की उडान) 2024' महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले.

जागतिक महिलादिना निमित्त सावनेर येथे लोकरंग कलाश्रृंगार गृह तर्फे अस्तित्व (हौसलो की उडान) 2024' महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले.

Delhi91-bps live news network 

सावनेर : (12 मार्च)आंतरराष्ट्रीय महिला दिन' आपण दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा करतो. या विशेष दिवशी विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानाची आठवण केली जाते. महिलांशी संबंधित विषय समस्यांवर लक्ष दिले जाते आणि त्यावर काम करणे आणि त्यांच्याबद्दल त्यांचे हक्कांबद्दल बोलणे हे 'महिला दिन' साजरा करणे मागचे उद्देश असतो. दरवर्षी 'महिला दिना'साठी एक थीम निवडली जाते आणि ती साध्य करण्यासाठी प्रयत्न देखील केले जातात 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' देशभरात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरा केला जात असतो. कार्यालयांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये तर शैक्षणिक संस्थांमध्ये, शाळांमध्ये सर्व कार्यालयांमध्ये, भाषण वादविवाद अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.

याअनुषंगाने सावनेर शहरात १० मार्च २०२४ रोजी अस्तित्व (हौसलो की उड़ान)' या महिलादिनास विशेष कार्यक्रमाचे आयोजन लोकरंग कलाश्रृंगार गृह सावनेर तर्फे राम गणेश गडकरी नाट्य सभागृह येथे महिला सशक्तिकरण आणि त्यांच्या सुप्तगुणांची स्तुति करून त्यांचा गौरव करण्याच्या हेतुने करण्यात आले.

कार्यक्रमाला मुख्य अतिथि म्हणून महिला सुरक्षा समिति व महा. लोकदल सदस्या *श्रीमती जीजाबाई तातोड़े , बी.एन.आय. सदस्या सौ.कांचन नितेश ठाकरे तसेच शास्त्रीय नृत्य कलाकार सौ. वैष्णवी प्रथमेश देशपांडे व मुख्याध्यापिका सौ. सीमा गोतमारे यांची प्रमुख उपस्थिति होती .

या कार्यक्रममधे खेळ साडीचा, एकल व समूह नृत्य, पाककला, श्रीखंडी वेशभूषा यासारख्या विविध खेळ व स्पर्धानसोबतच नृत्यअरंगम नृत्य केंद्र सावनेर च्या विद्यार्थीनींचे शास्त्रीय व लोकरंग महिला कलामंचकडून लोकनृत्य उपशास्त्रीय नृत्य यांचे विशेष प्रस्तुतिकारण करण्यात आले.

विशेष आकर्षण म्हणजे 2024 चा लोकरंग कलाभूषण जीवन गौरव पुरस्कार देउन सावनेर विभागातील जेष्ठ लेखिका व माजी मुख्याध्यापिका मा. श्रीमती सुनंदाताई रा. गोतमारे त्यांचा गौरव करण्यात आला. सोबतच विविध स्पर्धांच्या विजयी स्पर्धाकांना बक्षिसे देऊन त्यांना सन्मानाने गौरविन्यात आले.

कार्यक्रमातिल स्पर्धेचे परीक्षण नचिकेत धोटे सर , वैष्णवी मॅडम आणि कांचन मॅडम यांनी तर कार्यक्रमाचे संचालन योगिता मॅडम व आकाश सर यांनी केलं . तसेच आयोजन मीनाक्षी गजभिये ,योगिता घोरमारे ,सुवर्णा भगत ,आकाश बरवड सर यांनी केले. 

कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संगीता डोंगरे, नमिता इलमकर,पायल सूर्यवंशी, ममता पवार , पत्रकार दिलीपजी घोरमारे, आर्यन चित्तेवान, प्रज्वल अतकरे , अनिकेत ढाले व चंदन बरवड यांचे सहकार्य लाभले.