*काटोल येथे आज छत्रपती शिवाजी महाराज आणि संत शिरोमणी रविदास महाराज यांची संयुक्त जयंती साजरी*

काटोल:- राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका,काटोल येथे कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज व संत शिरोमणी रविदास महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. अशोक भक्ते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. रेवाराम मालखेडे व प्रा. डॉ. विलास फरकाडे उपस्तिथ होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून योगेश भोसे व दिगांबर टुले यांची उपस्तिथ होती . प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. रेवाराम मालखेडे यांनी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या सामाजिक जीवन कार्य या विषयावर आपले विचार मांडत चांगला समाज घडविण्यात रविदास महाराज यांचे योगदान समजावून सांगितलले तर प्रा. डॉ विलास फरकाडे यांनी शिवाजी महाराज यांचे राष्ट्रनिर्मतीसाठी योगदान व सामाजिक कार्य सांगत सर्व विद्याथ्र्यांचे मार्गदर्शन व प्रबोधन केले. तर योगेश भोसे यांनी महाराजांचे नियोजन व दूरदृष्टी समजावून सांगताना आपले विचार व्यक्त केले. तसेच अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. अशोक भक्ते यांनी अनेक महापुरुषांचा संदर्भ देत महामानवाच्या जयंती निमित्ताने विद्यार्थाना मार्गदर्शन करत त्यांचे जिवन कार्य सांगितले. कार्यक्रमाची सुरवात महापुरुषांना अभिवादन करून व संविधानाची प्प्रस्तावना वाचून करण्यात आली ,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक गायकवाड, प्रशांत शेंडे, प्रा.अरुण सोमकुवर, देवानंद बोरकर, पंकज उके ,रवी असरेट, सुषमा सहारे, प्रतिभा देशभ्रतार, प्रफुल धापोडे, सुवर्णा सहारे, ललित मुसळे, गौरव पेठे, भूषण सोंनटक्के, मुकेश सोनटक्के, साधना खवशे, धनंजय उमक, प्रणव सुकटकर, श्वेता गाखरे, लोकेश सुरजुसे, नीलम कौरती यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन शुद्धोधन गराडकर , प्रास्ताविक रवी असरेट तर आभार प्रदर्शन विवेक गायकवाड यांनी केले.

*काटोल येथे आज छत्रपती शिवाजी महाराज आणि संत शिरोमणी रविदास महाराज यांची संयुक्त जयंती साजरी*