ग्रामरोजगार सेवक संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख, करणार आमरण उपोषण!
ग्रामरोजगार सेवक संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख, करणार आमरण उपोषण!
महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना रजिस्टर नंबर एन जी पी ५१०२ चे राज्य प्रसिध्दी प्रमुख श्री सोनी शर्मा करणार आमरण उपोषण.
दिनांक ११ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, रोजगार हमी योजना मंत्रालय चे अवर श्री दिनेश वाघमारे साहेब यांना दिलेल्या निवेदनात श्री सोनी शर्मा यांनी, महाराष्ट्रात मागील सतरा वर्षांपासून रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना, केंद्राच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्यानुसार पुर्णवेळ नियमित नियुक्ती आणि किमान वेतन कायद्यानुसार, किमान वेतनाचा शासन निर्णय दिनांक १ ऑक्टोबर २०२४ पर्यंत न मिळाल्यास दिनांक २ ऑक्टोबर २०२४ पासून, ह्या भारत देशात जिथे असेल तिथे आमरण उपोषणाला बसणार आहे, असे निवेदन दिले आहे.
महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवकांना पुर्णवेळ काम करत असताना सुद्धा, शासन निर्णय काढून अर्धवेळ कामावर ठेवलेले आहे, आणि मॅनडेज च्या आधारित कमीशन बेस मानधनावर ठेवलेले आहे.
श्री सोनी शर्मा यांनी त्यांच्या निवेदनात, शासन निर्णय असतांना सुद्धा महाराष्ट्रात ग्रामरोजगार सेवकांना टिए डीए, अल्पोपहार, स्टेशनरी खर्च कधीच दिल्या जात नाही.
एकंदरीत महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवकांना गुलामासारखी वागणूक दिली जात आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायद्यानुसार ग्रामरोजगार सेवक हे पद पुर्णवेळ नियमित स्वरूपात आहे आणि कायद्यात तशी नियुक्ती सुनिश्चित करण्यासाठी निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र सरकार सतरा वर्षांपासून फक्त केंद्राकडून मिळणाऱ्या प्रशासकीय खर्चाच्या रक्कमेतून राज्यातील रोजगार हमी योजनेचा खर्च करत आहे,पण कायद्यानुसार राज्य सरकारने स्वतः चा फंड म्हणजे राज्य सरकारचा हिस्सा कधीच खर्च केला नाही.
राज्य सरकारने, महाराष्ट्र सरकारचा फंड टाकल्यास महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवकांना शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येवू शकतात.
वरील प्रमाणे सर्व बाबींचा उल्लेख, राज्य प्रसिध्दी प्रमुख श्री सोनी शर्मा यांनी आपल्या निवेदनात केला आहे, आणि ईमेल द्वारे, उपरोक्त निवेदन सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय अवर सचिव श्री दिनेश वाघमारे साहेब, सन्माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र सरकार यांच्या ईमेल पत्त्यावर पाठविले आहेत.