राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, ग्रामीण रुग्णालय काटोल येथे गुरुवार दिनांक 21 एप्रिल 2022 ला भव्य तालुका आरोग्य महामेळावा यशस्वीरीत्या संपन्न..

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, ग्रामीण रुग्णालय काटोल येथे गुरुवार  दिनांक 21 एप्रिल 2022 ला भव्य तालुका आरोग्य महामेळावा यशस्वीरीत्या संपन्न..

बि पी एस लाईव्ह न्युज, काटोल

प्रतिनिधी- मयुर बी. कुमरे

काटोल- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, ग्रामीण रुग्णालय काटोल येथे गुरुवार  दिनांक 21 एप्रिल 2022 ला भव्य तालुका आरोग्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले..
            या आरोग्य मेळाव्यामध्ये रक्तदाब , शुगर तपासणी , क्षयरोग तपासणी, ईसीजी तपासणी, मोतीबिंदू, चष्मा नंबर तपासणी, गरोदर माता तपासणी व उपचार, वंध्यत्व तपासणी व सल्ला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या आजारावर तज्ज्ञांमार्फत तपासणी व उपचार  निःशुल्क करण्यात आले.
              यादरम्यान ८०२ रुग्णांवर उपचार करण्यात आले यापैकी आयुष्मान भारत कार्ड 50 , नेत्ररोग विभाग 208, उच्चरक्तदाब 256 ,अस्थमा १२, मधुमेय 89 , मेडिसिन विभाग ७६, ईसीजी ११२, अस्थीरोग १०३, गरोदर माता 63, बालरोग 95 , कर्करोग 15, सर्जरी 91, एच आय व्ही  45, मानसिक रोग 19,  रक्ततपासणी 130 , एक्स रे 36 ,आयुर्वेदिक 18 होमिओपॅथि १३, रक्तदान 22 जणांचा समावेश आहे.
           शिबिराच्या यशस्वितेसाठी रुग्ण कल्याण समिती सदस्य शब्बीर शेख संदीप वंजारी, पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे ,उपसभापती अनुराधा खराडे ,खंडविकास अधिकारी संजय पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश डवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शशांक व्यवहारे, डॉक्टर सुधीर वाघमारे, डॉ. नरेंद्र डोमके, डॉक्टर अभिलाष एकलारे, अधिपरीचारिका पूजा तिवारी पूजा धुर्वे, नेहा पजारे, जयश्री खोडके, फार्मासिस्ट मंगेश गावंडे ,संकेत झाडे ,अजय मोरे ,रवी धोटे ,बाळासाहेब सुरवसे, रागीणी ढोले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य सहाय्यक प्रशांत विरखरे, तालुका आरोग्य सहाय्यक प्रताप वाडबुधे ,व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी सहकार्य केले.


          या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शशांक व्यवहारे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश डवरे यांनी केले.