*संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर, वाणी प्लॉट बार्शी येथील विद्यार्थिनींनी केला पोलीस स्टेशनमध्ये राखी बंधनाचा कार्यक्रम.*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी (ता.बार्शी). दि.19-08-2022 रोजी, भारतीय संस्कृतीत सण उत्सव यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. सर्वधर्म समभाव, एक्य, निरपेक्ष, निस्वार्थ आपलेपणा जपणारी सण-उत्सव साजरे करून एकनिष्ठ असल्याची जाणीव या माध्यमातून होते.
रक्षाबंधन हा बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असणारा आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून आपले रक्षण करण्यासाठी साकडं घालते. भावाच्या हातातील राखीचा धागा म्हणजे बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी जाणीव करून देणारा असल्याचे विचार आत्मसात करतो. हा उत्सव सगळीकडे आनंदात होत असला तरी आपल्या सर्वांचे रक्षण करणारे महाराष्ट्र पोलीस आपल्या कुटुंबापासून शेकडो किलोमीटर दूर असतात. बहिणीच्या रक्षाबंधनासाठी अनोख्या सणाला आपल्या बहिणीला भावाला मिस करत असतात. आपल्या पोलीस दादाला राखी बांधून त्यांच्या जीवनात आजच्या दिवशी असलेल्या बहिणीच्या प्रेमाची जागा भरून काढण्यासाठी संतोष गुळमिरे प्राथमिक विद्या मंदिर वाणी प्लॉट, आगळगाव रोड बार्शी शाळेतील स्काऊट आणि गाईड्स सावित्रीबाई फुले युनिट मधील मुलींनी बार्शी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर्व पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. बार्शी तालुका मा. DYSP नालकुल साहेब व शहर पोलीस निरीक्षक मा. अण्णासाहेब मांजरे व सर्व पोलीस कॉन्स्टेबल यांना राखी बांधून पेढा भरवला पोलीस बांधवांनी मुलींना मोठे होण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रक्षाबंधन कार्यक्रम साजरी करणारी पहिली शाळा म्हणून पाहिली जाते. या कार्यक्रमासाठी पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य बार्शी तालुका विभाग प्रमुख उमेश आनेराव यांनी मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थिनी सलोनी उपरे, सानवी आनेराव, मधुरा पवार, श्रेया गोरे, प्रज्ञा मोराळे, आदिती नूलगी, दिशा दरेकर, नम्रता काळे, मार्गदर्शक- अखंडेकर सर.