*रविवारी पाच वर्षाच्या आतील बालकांना पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम*

*रविवारी पाच वर्षाच्या आतील बालकांना पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम*

सोलापूर- पल्स पोलिओ अत्यंत महत्वाकांक्षी व व्यापक आहे. या मोहिमे अंतर्गत 0 ते 5 वयोगटातील बालकांना रविवार दि.27-02-2022 रोजी 3002 केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी श्री शितल कुमार जाधव यांनी दिली.ही मोहीम जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद चे कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत राबविण्यात येणार असुन ग्रामीण विभागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, नागरी भागासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व महानगरपालिका क्षेत्रासाठी आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत दिली जाणार आहे. 5 वर्षाखालील बालक पोलिओ पासून वंचित राहता कामा नये यासाठी प्रवास करणाऱ्या बालकां साठी एसटी बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मंदिरे, धार्मिक स्थळे या ठिकाणी ही लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. या मोहिमेत ग्रामीण व शहरी भागासाठी 3002 लसीकरण केंद्रे व 5 लाख 50,000 पोलिओ डोस, मनुष्यबळ- 7013, पर्यवेक्षक- 598, मोबाईल टीम- 144 अशाप्रकारे सज्ज राहणार आहेत. स्त्री व पुरुष आरोग्य सहायक- 354, आरोग्य सेवक- 452, आरोग्य सेविका- 4182, आशा वर्कर- 2763 यांचा देखील समावेश असण्याची माहिती डॉ.अनिरुद्ध पिगळे यांनी दिली. पल्स पोलिओ डोस मध्ये वंचित राहिलेल्या बालकां साठी रविवार पासून 3 दिवस घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस देण्यात येणार आहे असे आदेश देण्यात आले आहेत.