सावनेर शहर स्थित मां मीनाक्षी टॉकीजमधे ""बाई पण भारी देवा "" हा चित्रपट पाहण्यासाठी महिला प्रेक्षकांची भन्नाट गर्दी .

सावनेर शहर स्थित मां मीनाक्षी टॉकीजमधे "बाई पण भारी देवा" हा चित्रपट पाहण्यासाठी महिला प्रेक्षकांची भन्नाट गर्दी .

प्रतिनिधी - वाहिद शेख 

Delhi91 bpslive news network 

सावनेर : (दि.18 जुलै) 

उत्तम कथा , दमदार अभिनय , प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे संवाद आणि दिग्दर्शकाची कमाल हे सगळं समीकरण जुळून आल्याने चित्रपट सुपर डुपर हिट तर होतोच पण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यदेखील गाजवतो . केदार शिंदे यांचा बाईपण भारी देवा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुल गाजवतोय. अवघ्या 5 कोटींचे बजेट असलेला या सिनेमाने आत्तापर्यंत 38 कोटींचावर पल्ला गाठला आहे. बॉलिवूडला टक्कर देणाऱ्या चित्रपटाच्या टीमचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांच्या मुख्य भूमिका असलेला ""बाई पण भारी देवा ""सध्या प्रेक्षकांची मन जिंकत आहे. 

सहा महिलांची जादू प्रेक्षकांवर चालली आहे. बाईपण बॉक्स ऑफिसवर यशस्वी होत आहे. चित्रपटासाठी महिला प्रेक्षकवर्ग गर्दी करत आहेत.

सावनेर स्थित मीनाक्षी टॉकीजमधे चित्रपटासाठी महिलावर्गाची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे.

""बाई पण भारी देवा"" चित्रपट महिला वर्गाला आवडला असून महीलाप्रेक्षक आपल्या मैत्रिणींसह, सोसायटींचा ग्रुप, आई-लेक किंवा सासू- सून चित्रपटासाठी गर्दी करु लागल्या आहे. महिला प्रेक्षकांची संख्या अधिक आहे. मुंबई, पुणे नागपूर, ठाणे याठिकाणी तर चित्रपट विकेंडला हाऊसफूल होत आहे . 

वेडनंतर बाईपण भारीच...

मराठीतील सर्वाधिक कमाईचा विक्रम आजही सैराटच्या नावावर कायम आहे. त्याखालोखाल रितेश देशमुखच्या वेडने मराठी बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली. त्यानंतर आता केदार शिंदेंच्या बाई पण भारी देवाने धुमाकूळ घातला आहे. सध्या या चित्रपटाचे 750 स्क्रीन्सवर चित्रपट दाखवला जात आहे. तर, 14 हजारांहून अधिक शो सुरू आहेत. भारताबाहेरही हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.