खंडोबाचे वाकडी येथे चंपाषष्ठी निमित्त पाच दिवसापासून भाविकांची मांदियाळी. .
श्रीरामपूर
खंडोबाची वाकडी या ठिकाणी गेल्या पाच दिवसा पासून पश्चष्ठीनिमित्त भाविक मोठ्या प्रमाणांत हजेरी लावत आहेत. त्यामुळे वाकडी या गावांत आनंदोत्सवात खंडोबाची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली आहे.आत्तापर्यंत जवळपास अडीच ते तीन लाख भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनाचा घेतला आहे.त्याचबरोबर सतत पाच दिवसांपासून खंडोबाची वाकडी या ठिकाणी रोज रात्री जागरण गोंधळाचा भव्य कार्यक्रम चालू आहे.अनेक भाविक रात्री जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला हजर असतात. त्यामुळे खंडोबाची वाकडी या ठिकाणी दिवस-रात्र भाविकांनी परिसर गजबजला असून या ठिकाणी अनेक लहान मोठ्या व्यावसायिक लोकांनी देखील आपले विविध प्रकारच्या खेळण्याची दुकाने,भांड्याची दुकाने ,कपड्यांची दुकाने लागलेली असून खेळणी भांडी घेण्याकरता अनेक भाविक या ठिकाणी गर्दी करीत आहेत.खंडोबाची वाकडी या ठिकाणी नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत तसेच जिल्ह्याच्या अनेक भागातून भाविकांच्या मिरवणूका वाजतगाजत खंडोबाच्या वाकडीकडे येत आहे.काही भाविकांनी आपले नवस फेडण्यासाठी याठिकाणी भव्य भंडारा आयोजित केला आहे.त्यामुळे महाप्रसादाचा लाभ अनेक भाविक घेताना दिसून येत आहे.
खंडोबाची वाकडी मंदिराच्या ट्रस्टने चंपाषष्ठी निमित्ताने सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत..!!