शब्दगंध साहित्य परिषद श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी प्राध्यापक श्री. लेविन भोसले यांची निवड
श्रीरामपूर ::--शब्दगंध साहित्यिक परिषदे मार्फत ग्रामीण भागातील निवेदित साहित्यिकांना मार्गदर्शन करून त्यांना संधी देऊन साहित्यिकांच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शब्दगंध साहित्यिक परिषद गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून करत आहे. यामध्ये निवेदित साहित्यकार यांनी आपली अनेक पुस्तके आणली आणि साहित्यिक रसिकांना आनंद देण्याचे काम या माध्यमाद्वारे शब्दगंध परिषद करीत आहे. असे मत प्राध्यापक डॉक्टर बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या प्रमुख भाषणात व्यक्त केले. मावळते
प्राध्यापक मीराबक्ष यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच श्रीरामपूर येथे बैठक संस्थेचे सचिव श्री. सुनील गोसावी पंचायत समिती श्रीरामपूर येथील सभापती सौ. वंदनाताई मुरकुटे संस्थेचे खजिनदार श्री. भगवान राऊत यांच्या उपस्थितीत पार पडली. हॉटेल राधिका येथे करियर कॉम्प्युटर अकॅडमी या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होते. यावेळी दिवंगत साहित्यिक, कवी, पत्रकार यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉक्टर सलीम शेख, कवी आनंदा साळवे, मेजर कृष्णा सरदार, हाजी इसाक शेख ,डॉक्टर शिवाजी काळे ,नाट्यकलावंत अजय घोगरे ,कवी बाबासाहेब पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक मीराबक्ष यांनी मागील दोन वर्षाचा लेखाजोखा चे वाचन केले. संस्थापक सचिव श्री. सुनिल गोसावी म्हणाले की श्रीरामपूर शब्दगंध ने कोरोणा काळातही आपले ऑनलाईन उपक्रम राबविले. आणि आपल्या सभासदांना एकत्र ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवला. आणि याचा उपयोग शब्दगंध परिषदेला निश्चितच होईल असा विश्वास दाखवला. त्यावेळी सर्वानुमते नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली श्रीरामपूर शब्दगंध तालुका शाखा अध्यक्षपदी प्राध्यापक लेविन भोसले यांची तर उपाध्यक्ष कवी रज्जाक शेख, अध्यक्षपदी संगीता फासाटे, सचिवपदी आनंदा साळवे ,सहसचिवपदी बाबासाहेब पवार, खजिनदारपदी महेंद्र कुलकर्णी, प्रसिद्ध प्रमुख राजेंद्र देसाई. यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यकारणी सदस्यपदी हाजी इसाकभाई शेख, डॉक्टर सलीम शेख तर सल्लागारपदी डॉक्टर प्राध्यापक बाबुराव उपाध्ये ,मेजर कृष्णा सरदार ,डॉक्टर वंदनाताई मुरकुटे ,सुभाष गायकवाड ,निव्रुत्त पोलीस अधिकारी सुधाकर ससाने ,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे,सामाजिक कार्यकर्ते भाऊराव माळी आदींची निवड करण्यात आली.
संस्थापक सचिव श्री. सुनील गोसावी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या संस्थेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन केले. श्रीरामपूर कार्यकारी पदाधिकारी यांनी अहमदनगर जिल्हा कार्यालय सलग्न राहून कामकाज करावे अशी सूचना मांडली. संस्थेचे भगवान राउत यांनी कलाकारांचे मानधन तसेच संस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली, कवी आनंदा साळवे यांनी शेवटचे आभार मानले. कार्यक्रमा करिता डॉक्टर प्राध्यापक शैलेंद्र भणगे यांच्यासह अनेक वेगवेगळ्या स्तरातील कार्यकर्ते ,साहित्यिक, कवी.उपस्थित होते,