*उंबरगे गावातील आराध्यदैवत मलिकसाहेब देवस्थान ची यात्रा उत्साहात साजरी*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
उंबरगे.(ता.बार्शी). उंबरगे गावातील आराध्य दैवत असलेले मलिक साहेब देवस्थान यांची यात्रा अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून म्हणजेच कोरोना महामारी काळात शासनाच्या नियमाप्रमाणे यात्रा बंद ठेवण्यात आली होती मात्र यावर्षी ची यात्रा अतिशय उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडली.
मलिकसाहेब देवस्थान या गावच्या यात्रेच्य परंपरेच्या दृष्टीने खूप जुना इतिहास असून ही यात्रा परंपरेने चालत आलेली आहे. सदर यात्रेकरिता गावातील यात्रा पंचकमिटी मार्फत वर्गणी गोळा करून त्या माध्यमातून गावच्या हितासाठी तसेच देवस्थान विकासासाठी तसेच परंपरेने चालत आलेले मनोरंजनाचे कार्यक्रम पार पाडण्यासाठी वर्गणी चा उपयोग केला जातो. यामध्ये उरूस, संदल, शोभेचे दारूकाम, कुस्त्या, लोककलावंंतांचे कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमाची रेलचेल यात्रा दरम्यान या गावातून होत असते. गावातील स्थानिक कलाकारांचे नाटक बसून सादरीकरण केले जाते.
यावर्षी शांताई नाट्यकला प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत 'घुंगरू माझे तुटले रे" हे गावातील कलाकाराचे उत्तम नाटक होते. गावातील फक्त मुलींचे नाटक बसविण्यात आले. या गावच्या तसेच जिल्ह्याच्या दृष्टीने हा पहिलाच प्रयोग करण्यात येत होता. श्री रामकृष्ण जोडवे सर लिखित "उपकार दुधाचे" या नाटकाचे सादरीकरण गावातील मुलींनी केले. नाटकाच्या कथा घटनेचा विषय हा अतिशय हृदयस्पर्शी असून त्याच्या माध्यमातून तरुणाईने आपल्या संस्कृती व संस्काराला विसरल्यास आपल्या कुटुंबावर तसेच वैयक्तिक जीवनावर काय दुष्परिणाम होतात त्याचबरोबर आई-वडिलांचे आपल्या जीवनातील असलेले स्थान हे किती महत्वाचे आहे याकडे दुर्लक्ष केलं तर किती आपल्यावर प्रसंग येऊ शकतात असे अनेक सुंदर कार्यक्रम उंबर्गे गावातील रसिकांनी अनुभवले.
सदर नाट्य प्रयोग यशस्वी करण्यासाठी श्री समाधान विधाते, श्री शरद येडके सर, सरपंच दादासाहेब विधाते यांनी कष्ट घेतले. तसेच सदर नाट्यप्रयोग साठी गावच्या यात्रा कमिटीनेही मोलाचे सहकार्य करून मुलींच्या कलेचे योग्य ते कौतुक केले. यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, पंच कमिटी व तरुण वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.