क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या जमिनीवरील वरील अनाधिकृत बांधकाम व ताबा हटवण्यासाठी जिल्ह्यातील ख्रिश्चन समाज व महाराष्ट्रातील सर्व ख्रिश्चन संघटना एकवटल्या.
अहमदनगर :: -- ख्रिश्चन समाजाचे जेरुसलेम असणाऱ्या अहमदनगर शहराच्या मध्यभागात असलेल्या क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या भूखंडावर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अनधिकृतपणे ताबा घेऊन बांधकाम सुरू केले आहे.हि बाब अहमदनगर येथे असणाऱ्या ख्रिश्चन समाजाच्या लक्षात आल्याबरोबर या प्रकरणी ख्रिश्चन समाजाने त्वरित जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे धाव घेतली.याप्रकरणी जिल्हाधिकार्यांनी त्वरित लक्ष घालून ख्रिश्चन समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
अहमदनगर येथील क्लेरा ब्रूस हायस्कूल येथील सुमारे 26 एकर भूखंड अमेरिकन मराठी मिशन या संस्थेच्या ताब्यात अनेक वर्षापासून आहे. ही मिळकत धर्मदाय आयुक्त यांच्या परिशिष्टात नोंदवली गेलेली आहे. तसेच सध्या ही जागा कोर्टाच्या आदेशाने तहसीलदार यांच्या ताब्यात आहे. मात्र हा भूखंड काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी विकत घेतला आहे असे भासवीत असून त्या ठिकाणी त्यांनी अनधिकृत बांधकाम देखील सुरू केले आहे. मागील 2007 व 2016 सालीही या भूमाफियांनी क्लेरा ब्रुस या संस्थेच्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे 2019 साली ही जागा स्थानिक प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. तरी देखील एक एकर भूखंडावर येथील बिल्डरने ताबा घेऊन बांधकाम सुरू केले आहे.ज्या बिल्डरांनी हे बांधकाम सुरू केले आहे त्या बिल्डरांनी अनेक गुंड प्रवृत्तीच्या तरुणाना रात्रंदिवस त्या ठिकाणी बसून भिंती बांधल्या आहेत. क्लेरा ब्रुस ही जागा ख्रिश्चन समाजाच्या मिशनरी त्यागाची , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , महात्मा फुले व फातिमा शेख यांच्या कार्याची साक्ष देणारे आहे. तसेच या जागेचे जतन करणे महाराष्ट्रातील प्रत्येक ख्रिश्चन व्यक्तीचे कर्तव्य आहे.हा भूखंड माफियाच्या ताब्यात न जाऊ देता तेथे झालेले अनधिकृत बांधकाम व तेथील भू माफियांचा ताबा हटवून त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी.
या करिता अहमदनगर येथील शिष्टमंडळ विजया जाधव ,अजय सूर्यवंशी, विद्या भाबळ, शीतल घुले, रेव्हरंड संजय पारधे तसेच अहमदनगर पहिली मंडळी चर्चचे विश्वस्त रवींद्र ठोंबरे, राजू देठे तसेच अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे आशिष शिंदे व डॉ. वंदना बेंजामिन , रेव्हरंड रवी चांदेकर मार्टिन पारधे .या सर्व ख्रिश्चन संघटना व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असणारे निवेदने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना गेली असता त्यांनी त्वरित प्रशासनाकडून याबाबतची माहिती मागवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या भूखंडाशी संबंधित असणारे सर्व कागदपत्रे तपासण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत चा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासन देखील सतर्क झाले आहे. हा भूखंड तहसीलदार यांच्या ताब्यात असताना देखील भूखंड माफियांनी या भूखंडाचा ताबा घेतलाच कसा ?? या भूखंडाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील याठिकाणी अवैधपणे बांधकाम कसे काय करण्यात आलेले आहे. ?? असा प्रश्न प्रवीण वाघमारे यांनी उपस्थित केला. सदर जमिनीचा ताबा घेणाऱ्या लोकांनी शासनाचा आदेश मोडल्यामुळे त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी या सर्व संघटनांनी केली आहे.या घटनेमुळे सर्व समाजांत असंतोष निर्माण झाला आहे.