अखेर महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार ग्रामरोजगार सेवकांच्या भविष्याचा प्रश्न निकाली निघणार!
दिनांक १८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवकांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे चिरंजीव माननीय खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या, माननीय खासदार श्री श्रीकांत शिंदे साहेब यांनी ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय रोहयो मंत्री श्री संदीपान भूमरे साहेब यांच्या पर्यंत पोहचविल्या जातील आणि लवकरच यावर उपाययोजना करण्यात येतील आणि ग्रामरोजगार सेवकांना न्याय देण्याचे काम महाराष्ट्रातील शिंदे साहेबांचे सरकार करणार आहे असा शब्द दिला आहे.
महाराष्ट्रातील सरकार प्रत्येकाला न्याय देण्याचे काम करत आहे म्हणून आता सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबां पर्यत ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या पोहोचतील आणि ग्रामरोजगार सेवकांना निदान शेजारच्या मध्यप्रदेश राज्यातील ग्रामरोजगार सेवकांना मिळणाऱ्या प्रतिमाह १८०००/- रुपये प्रमाणे दिल्या जातील आणि इतर मागण्या विमा संरक्षण,टिए डीए पुर्णवेळ नियुक्ती बाबतीत शासन निर्णयात दुरुस्ती इतर समस्यांचे निराकरण होईल यामुळे महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार ग्रामरोजगार सेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वी किंवा हिवाळी अधिवेशनात ग्रामरोजगार सेवकांना न्याय मिळण्या बाबतीत घोषणा केली जाऊ शकते.