*मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे तिहेरी हत्याकांड*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर मंगळवेढा रोडवरील एक किलोमीटर अंतरावर सायंकाळी पाचच्या दरम्यान डोक्यात दगड घालून व धारदार शस्त्राने अतिशय क्रूर पद्धतीने वार करून खून करण्यात आला.
एकाच घरातील तीन महिलांचा खून झाल्यामुळे सर्व नंदेश्वर गावांमध्ये शोककळार पसरली. अशी घटना तालुक्यामध्ये पहिल्याच वेळेस घडली आहे. नंदेश्वर पासून एक किलोमीटर अंतरावर महादेव माळी या नावाची वस्ती आहे. दुपारी पाचच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने दिपाली बाळू माळी (वय 25), संगीता महादेव माळी (वय 50), ताराबाई बाबाजी माळी (वय 45) या तीन महिलांचा निर्गुण खून झाला व त्यांच्या घरासमोर मृत अवस्थेत पडलेले दिसून आले. दुपारी चार वाजता बाळू व जयश्री सांगोल्याहून परत आल्यानंतर हे दृश्य पाहताच आरडाओरडा सुरू केला. या घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत माने घटनास्थळी आले असून या खुना प्रकरणामागील शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच या झालेल्या तीन महिलांच्या खून प्रकरणी शेजारील एका व्यक्तीस ताब्यात घेतले असून तिन मृतदेह शिवविच्छेदनासाठी मंगळवेढा येथे पाठवण्यात आले आहेत. या घटनेच्या वेळी रुद्र नावाचा अंदाजे चार ते पाच वर्षाचा मुलगा या भीतीने घरात जाऊन लपून बसला म्हणून तो मुलगा वाचला नाहीतर या हत्याकांडाचा बळी ठरला असता. हत्या झालेले दोन मुली व नात सुना होत्या.