लाखो भविकांच्या उपस्थितीत तुकाराम बीज सोहळा संपन्न,वारक-यांनी गजबजली श्री क्षेत्र देहूनगरी
प्रतिनिधी देहू - संत तुकाराम महाराज बीज सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूगाव मधे दाखल झाले होते .संत तुकाराम महाराज संस्थान आणि देहू नगरपंचायत प्रशासना मार्फ़त भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. या सोहळ्यासाठी देहूत विविध भागातून दिंड्या दाखल झालेल्या आहेत. देहुतील इंद्रायणीचा काठ भाविकांनी फुलून गेला होता .संत तुकाराम महाराज संस्थान मार्फ़त मुख्य देऊळवाडा, वैकुंठस्थान येथील मंदिराची विद्युत रोषणाई, रंगरंगोटी करण्यात आली होती . मंदिरालगतच्या परिसराची जादा कर्मचारी नेमून स्वच्छता करण्यात आली होती . मुख्य देऊळवाड्यात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, वैकुंठस्थान मंदिर परिसरातही कॅमेरे बसविले आहे. इंद्रायणीच्या काठी राज्यातील अनेक दिंड्या दाखल झाल्या आहेत
. टाळ, मृदंग आणि चिपळ्यांच्या घोषात कीर्तन, प्रवचने सुरू असून तुकोबांच्या अभंगगाथेचा गजर करत हा सोहळा संपन्न झाला.पहाटे देऊळवाड्यात काकडआरती झाल्यानंतर श्रींची महापूजा, तुकोबा शिळा मंदिरात महापूजा,विठ्ठल-रखुमाई मंदिरात महापूजा, झाल्यानंतर पालखीचे वैकुंठगमनस्थानी प्रस्थान झाले.व लाखो भविकांच्या उपस्थितीत जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा उत्साहात संपन्न झाला.