खाण कामगाराची‌ गळफास लावून आत्महत्या. वाघोडा खाण वसाहत परीसरातील घटना*

खाण कामगाराची‌ गळफास लावून आत्महत्या. वाघोडा खाण वसाहत परीसरातील घटना*

*खाण कामगाराची‌ गळफास लावून आत्महत्या. वाघोडा खाण वसाहत परीसरातील घटना*.                                                बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क.                                    सावनेर:-वाघोडा येथेेदि 28/9/2022रोजी खाणीत काम करणाऱ्या कामगाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. एका व्यक्ती ने सावनेर पो. स्टे. अंतर्गत येणाऱ्या वाघोडा खाण परीसरातील पिण्याचे पाण्याचे टाकी मागे असलेल्या झाडाला बुधवारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली . मृतकाचे नांव रामप्रसाद कुंजीलाल पंधराम 56 रा शक्तीनगर वसाहत वाघोडा असे आहे. मृतक खाण क्र.1 मध्ये कामगार म्हणून कार्यरत होता आणि खाण परीसरातील फिल्टर प्लाॅट चा मागील वसाहतीत राहत होता मृतकाची एक वर्षा पुर्वी पत्नी मरण पावली तेव्हा ‌पासुन मृतक हा तणावात राहत होता त्यामुळे नैराश्यातून बुधवारी रात्री 12 वाजताचे सुमारास वसाहती ला लागुनच असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली .मुलाला घटनेची कुजबुज लागताच घटना स्थळी जावुन बघीतले असता वडील झाडाला मृत अवस्थेत आढळले . समाजसेवी हितेश बनस़ोड यांच्या निःशुल्क एम्बुलेंस द्वारे मृतदेह सावनेर येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले .डाक्टरांनी पोस्टमार्टम केल्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले मुलगा नामे अनील पंधराम यांच्या तक्रारीवरुन सावनेर पोलीसांनी मर्ग चा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पुलिस निरीक्षक मारुती मुळक यांचा मार्गदर्शनात पीएसआय व्यंकटेश डोनोडे करीत आहे .