राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी श्री उमेश आनेराव यांची निवड
बी पी एस राष्ट्रीय न्यूज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी सम्मेद तरटे
बार्शी - राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री उमेश आनेराव यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री उमेश आनेराव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सर्वांच्या मते हा निर्णय घेण्यात आला. ह्यामध्ये संघटनेचे शंकर वानेगावकर, महिला अध्यक्ष विजयालक्ष्मी आनेराव प्रदेशाध्यक्षा स्मिताताई तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.