*अमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी नवीन उपक्रम राबवण्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षका मा. तेजस्विनी सातपुते यांनी दिली*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात अमली पदार्थाचे विक्री रोखण्यासाठी जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय विरोधी कार्यकारी समितीच्या कार्यकारी बैठकीच्या वेळेस तेजस्विनी सातपुते मॅडम बोलत होते. ते म्हणाले की अमली पदार्थाची विक्री व तस्करी थांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रम दरम्यान या सर्व बाबींना आळा बसेल. यावेळी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, औषध निरीक्षक सचिन कांबळे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, सिविल हॉस्पिटल चे डॉ. बी.टी. दूधभाते पोलीस निरीक्षक एस. आर. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा अमली पदार्थाचे फॅक्टरीमध्ये उत्पादन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सातपूते मॅडम यांनी दिल्या.
प्रत्येक विभागांनी दत्तक घेतलेल्या तालुक्यांमध्ये अमली पदार्थाच्या दुष्परिणामांची माहिती जनतेला द्यावी असेही SP सातपूते मॅडम यांनी आवाहन केले.