*बार्शी तालुका पोलीसांच्या कटाक्ष नजरेने 33 लाख ३३ हजार २१० रुपयांची विदेशी दारू जप्त करत बेधडक कारवाई*

*बार्शी तालुका पोलीसांच्या कटाक्ष नजरेने 33 लाख ३३ हजार २१० रुपयांची विदेशी दारू जप्त करत बेधडक कारवाई*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बार्शी,बळेवाडी)

बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा प्रकार होऊन मालाविषयी गुन्हे घडणार नाहीत याकरिता पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम यांनी पोलीस ठाणे कडील जास्तीत जास्त अंमलदार यांना पेट्रोलिंग करणे करता आदेश दिले होते. त्या आदेशाचे बार्शी तालुका पोलीस यांनी काटेकोरपणे आपली ड्युटी निभावून आपले कार्य नाकाबंदी व पेट्रोलिंग करण्यात येत आहे.

दि.23-09-2022          रोजी रात्री 7:00 ते 10:00 च्या वेळेस बार्शी बायपास रोडला पेट्रोलिंग करणे करिता पोना /150 आप्पासाहेब लोहार, पोना /1370 महेश डोंगरे यांना नेमण्यात आले होते. पेट्रोलिंग दरम्यान संशयित वाहने इसम यांची चौकशी करणे बाबत सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान त्यांना मौजे जामगाव हद्दीत बाळराजे चौकात एक कार संशयित आली असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी आम्हाला तात्काळ माहिती दिली. तात्काळ आम्ही मदतीसाठी पोलीस पथकासह गेलो असता वरील नमूद पोलीस अंमलदारांनी सदर कार मधील इसमाची चौकशी करिता जात असताना ते पाहून तो इसम पळून जाण्याचा प्रयत्न केला त्या इसमाचा पाठलाग करून पकडले व बाकी पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पळाले. त्या इसमाचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी सांगण्यास नकार दिला पण त्याला विश्वासात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारण्यात आला. सदरील त्याचे नाव रामा शंकर काळे वय 20 राहणार कन्हेरवाडी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद असे सांगितले. बाकी फरारी यांची नावे 1)पल्ल्या बिभीषण काळे 2)अमोल नाना काळे ३)चंदन भास्कर काळे 4)सुभाष लाला काळे सर्व राहणार आंदोरा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद असे सांगितले. आम्ही पंचा समक्ष त्याची ताब्यात असलेली कार क्रमांक MH-05 AX -1286 तपासून पाहता त्या गाडीच्या डिक्की मध्ये तलवार, कटावणी, टॉमी, स्क्रू ड्रायव्हर, मिरचीचे पूड मिळून आले. त्यामुळे आमची खात्री झाली सदर इसम हे कुठेतरी दरोडा टाकण्यासाठी जात असून सदरचे हत्यारे पंचा समक्ष पंचनामा करून जप्त केली आहे.

वरील प्रमाणे सदर इसमा वर गुन्हे दाखल असल्याने हे इसम दरोडा टाकण्याच्या तयारीने फिरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाणे गु.र.न. 274 /22 भादवी कलम 399 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 चा प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी क्रमांक 1 नमूद गुन्हा अटक करण्यात आला आहे.

वरील आरोपीस विश्वासात घेऊन त्यांची सखोल चौकशी दरम्यान त्यांनी सांगितले की वरील दि.22-09-2022 रोजी रात्री माझे साथीदार अजून चार जण असून त्यांचे नावे व पत्ता माहित नाही असे सांगितले. तसेच त्या इसमाने सांगितले की आम्ही मौजे मिरज जिल्हा सांगली येथील एका दारूचे गोडाऊन फोडून त्यातील दारूचे बॉक्स एका ट्रकमध्ये आणली. सदरचा ट्रक लपवून ठेवलेला आहे असे सांगितले. तो ट्रक मोजे जामगाव तालुका बार्शी शिवारातील एका खोल खोदगा लपवून ठेवलेला आहे तेव्हा पोलिसांनी तो ट्रक जप्त केला असता त्यामध्ये विदेशी दारूचे 311 बॉक्स किंमत 33 लाख 33 हजार 210 रुपये किमतीची असलेली विदेशी दारू व 9,00,000 /-रुपये किमतीचा ट्रक मिळून आल्याने तो पंचा समक्ष जप्त करण्यात आला आहे.

सदरील कामगिरी मा. पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांचे नेतृत्वाखाली पोसई शिरसाट, पोना/150 लोहार, पोना/ 1370 महेश डोंगरे, पोना/1747 केकान, पो.हे.कॉ. /1575 बोबडे ,पो.हे.कॉ. /373 मंगरूळे, पो.हे.कॉ./ 851 राठोड, पोलीस हेड कॉ. 976 देवकर पोलीस कॉन्स्टेबल 446 शेलार पो.हे.कॉ./ 499 भोसले, पो.हे .कॉ./1381 मुंडे, पोना /1614 घाटे, पो. कॉ. /837 शहाणे  पोना/ 1651 केकान, पोना/ 1219 आंधळे, पोना/196 खोकले, पो कॉ./ 69 धुमाळ, पोना/ 1996 बेद्रे, पो.कॉ. /918 भांगे, पो.कॉ.2000 वाघमारे यांनी केले आहे.