काटोल नगर परिषदेतील अपंगाचा निधी वाटप रडखडल्याने त्वरित वाटप करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार - वंचित बहुजन आघाडी

काटोल नगर परिषदेतील अपंगाचा निधी वाटप रडखडल्याने त्वरित वाटप करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार - वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी यांना अपंगाच्या निधिसाठी निवेदन सादर, अपंगांचे नगर परिषदेच्या प्रांगणात नारे निदर्शने करून निधी साठी केले आंदोलन
येत्या सोमवारला न प कार्यालयात अपंगाच्या निधी साठी बैठक घेवुन निधी वाटप केल्या जाईल सी ओ यांचे लेखी आश्वासन दिल्याने वंचित च्या आग्रहाने,अपंग भगीनीला व्हिल चेअर चे वाटप.

काटोल शहरातील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या अपंग बांधवांच्या हक्काचे 5टक्के निधी नगर पालिकेने कोरोणा काळापासुन अपंगांना वाटला नाही.शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी बजेट च्या 5टक्के निधी अपंगांना देण्यात यावा असा आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी केली नाही. त्याकरिता अपंग बांधवांनी अनेकदा आंदोलन केली, प्रशासानाशी अनेकदा चर्चाही केली फक्त वेळ काढु पणा करून त्यांची बोळवण करण्यात आली.प्रशासनाला त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन नगर परिषद प्रांगणात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात नारे निदर्शने करून निधी मिळण्याकरिता आंदोलन केले.

त्यानंतर मुख्याधिकारी यांना निवेदन देवून निधी जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. अशी भुमिका घेतल्यानंतर अखेर मुख्याधिकारी यांनी येत्या सोमवारी अपंगाची विशेष बैठक घेवुन निधी वाटप केल्या जाईल असे मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सोमवार पर्यंत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
जर का येत्या सोमवारला अपंग बांधवांना निधिचे वाटप केले नाही तर अपंग बांधवांचे बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळेस दिगांबर डोंगरे यांनी प्रशासनाला दिला. यावेळेस जैनुब शैख या अपंग भगीनीला व्हिल चेअर चे वाटप करण्यात आले. मुख्याधिकारी धनंजय बोरीकर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे  कार्यालयीन अधीक्षक देवेन कले, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय वानखेडे समुदाय संघटक धिरेंद्र माणेकर उपस्थित होते.

अपंग बांधवांच्या आंदोलनात
 पुरुषोत्तम सावरकर, कादर शैख, रमेश कोलसा सहीद पटेल ,देवा थोटे ,दिगांबर सत्तेकार, अजित शाहा ,नीळकंठ मेन्ढे ,पुरुषोत्तम राजूरकर ,वत्सलाबाई राजूरकर, जैनब पठाण, तनुजा खैरे, सुशीला लोहे, सुनिता चरडे, सुरेखा राजूरकर, कांता धुर्वे, तुकाराम भलावी, विलास लोही ,दामू सूरजूसे, प्रकाश नेवारे ,कृष्णाजी भलावी ,सिंदु हिरुडकर हे उपस्थित होते.