जिप शाळा ओस पडु नये म्हनुन, शासनाने शिक्षक भरती त्वरित करावी - सभापती संजय डांगोरे

1.

जिप शाळा ओस पडु नये म्हनुन, शासनाने शिक्षक भरती त्वरित करावी - सभापती संजय डांगोरे

काटोल:- ग्रामीण भागातील जिल्हा परिषद च्या शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी काटोल पंचायत समिती सदैव तत्पर आहे. काटोल पंचायत समितीमध्ये अनेक शैक्षनीक उपक्रम राबवल्याने विद्यार्थ्यांच्या पटसंखेत वाढ होतांना दिसत असली तरी त्यांना शिकवेल तरी कोन ? असा प्रश्न पडलेला आहे. काटोल पंचायत समीतीमधे शिक्षकांच्या मंजूर 390 पदांपैकी फक्त 323 शिक्षक कार्यरत आहे .आणि 68 शिक्षकांची रिक्त पदे असल्याने ती त्वरीत भरण्याची विनंती शासनास सभापती संजय डांगोरे यांनी केलीली आहे. जवळपास काटोल पंचायत समीतीमधे जिप शाळेत 5000 विद्यार्थी असलेल्या 136 शाळेमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडु नये याकरिता शासनाने त्वरित शिक्षकांची पदभरती मंजूर करावी .अशी विनंती काटोल पंचायत समितीचे सभापती संजय डांगोरे यांनी केलेली आहे.                         

दोन शिक्षकी शाळांची जबाबदारी सध्या जिप शाळेत काही ठिकाणी एका शिक्षकावर तर तिन शिक्षकी शाळेत दोन शिक्षकांवरआलेली आहे. याचा तान विद्यार्थी शिक्षक आणि पर्यायाने पालकांवर येत आहे . त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेत जिल्हा परिषद च्या शाळा मागे पडू नये म्हणून शासनाने ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांकडे लक्ष केंद्रीत करुन शासनाने त्वरित पदे भरती करावी. अशी मागणी काटोल पंचायत समितीच्या वतीने शासनास करण्यात येत आहे.