माता सुरक्षीत घर सुरक्षीत व जंतनाशक मोहीमेचा लाभ घेन्याचे आव्हान..!!

माता सुरक्षीत घर सुरक्षीत व जंतनाशक मोहीमेचा लाभ घेन्याचे आव्हान..!!

       प्रतिनिधी:- मयुर कुमरे... बि.पी. एस. लाईव्ह न्यूज नेटवर्क, 

काटोल:- शासनाचे वतीने आयोजित *माता सुरक्षीत तर घर सुरक्षीत मोहीम* प्रा.आ.केद्र कचारीसांवगा चे वतीने कार्यक्षेत्रात राबविण्यात येत असुन या निमित्ताने १८ वर्षावरिल सर्व किशोरवयीन मुली व महिलांची गावागावांमध्ये तपासणी व आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे.

           

     तसेच 10 ऑक्टोबर पासून जंतनाशक मोहीम राबविण्यात येत असुन मोहिमेचा लाभ घेन्याचेआव्हान मा.सलीलदादा देशमुख अध्यक्ष रुग्ण कल्याण समिती यांनी केले. यावेळी मा. चंद्रशेखरजी चिखले माजी उपाध्यक्ष जि.प तथा सदस्य नियोजन समीती,मा.खोब्रागडे सभापतीप.स.काटोल,मा.संजय डांगोरे प.स. सदस्य,मा.निलेशजी दुबे सामाजिक कार्यकर्ते,व रुग्ण कल्याण समिती सदस्य व जन आरोग्य समिती सदस्य उपस्थित होते.

या वेळी आरोग्य विषयक तसेच मोहिमेबाबत माहिती डॉ.कांदबरी ऊंबरहांडे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केद्र कचारीसांवगा यांनी दिली. डॉ. बोरकर, डॉ.नागपुरे,प्रशांत विरखरे आरोग्य निरीक्षक,काचरे आरोग्य निरीक्षक,पुजा चिकराम आरोग्य सहायिका,श्रीमती राव व सर्व प्रा.आ.केद्र कर्मचारी उपस्थित होते.