सावनेर येथील आम आदमी पक्षातर्फे श्रद्धांजली देण्यात आली .
आम आदमी पक्षातर्फे श्रद्धांजली देण्यात आली .
Delhi 91 bps live news network
ब्युरो रिपोर्टर - वाहिद शेख
सावनेर : दि.3 जून , ओडिशाचा बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी तीन रेल्वे गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 300 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 1000 हून अधिक जण जखमी आहेत. एनडीआरएफ आणि इतर सर्व यंत्रणांकडून कालपासून बचावकार्य सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे घटनास्थळी दाखल झाले आहेत . या अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे , अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
त्याच अनुषंगाने नागपूर जिल्हयातील सावनेर शहरात येथे आम आदमी पक्षाच्या वतीने रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली.
सावनेर शहर स्थित गांधी चौक येथील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आम आदमी पक्षाच्या सक्रिय नेते संजय टेंभेकर यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाच्या सर्व सावनेर पदाधिकारी सदस्य यांनी ओडिसा बालासोर जिल्हा येथिल झालेल्या भीषण रेलवे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीना 2 मिनिटांचा मौन राखून श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली .
यावेळी सावनेर शाखाचे आम आदमी पक्षातर्फे श्री संजय टैंभेकर , श्री संजय राउत , अंसार बाबा शेख , भाटी , अतुल निकोसे , कालिदास बुधौलिया , मदन मोरे , अनामिका ढिमोले , दिनेश मछले , ओम प्रकाश छत्रपति. श्री लांबट , मानकर , गोविंद सोनी इत्यादि कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थीती दर्शविली .