येत्या आठ दिवसांत (सीसीआय) नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सुरू करा . अन्यथा आमरण उपोषण !
येत्या आठ दिवसांत (सीसीआय) नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी सुरू करा .
अन्यथा आमरण उपोषण !
सावनेर : (४ जानेवरी) भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि राज्य पणन महासंघाने खरेदी केंद्र सुरू न केल्याने व्यापारी हमी भावापेक्षा कमी किमंतीमध्ये कापूस खरेदी करीत आहेत. कापसाच्या दरात चढ उतार हाेत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत . मात्र आर्थिक अडचणींमुळे शेतकर्यांनी नाईलाजाने मिळेल तो भाव पदरात पाडून आपला कापूस व्यापाऱ्यांना विकत आहे .
शेतक-यांच्या हितासाठी आम आदमी पक्ष सरसावली आहे . कापसाची संपूर्ण खरेदी भारतीय कापूस महामंडळ म्हणजेच सी.सी.आय (Cotton Corporation of India) व नाफेड (nafed) मार्फत करावी अशी मागणी सावनेर तालुक्यातील आम आदमी पक्षाचे नेते पंकज घटोळे व संजय टेंभेकर यांच्या शिष्टमंडळातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार सावनेर यांच्या मार्फत दिनांक ३ जानेवारी रोजी शुक्रवारला एका निवेदन पत्राद्वारे करण्यात आले . तसेच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कापूस (सी.सी.आय.) नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात येईल व त्याचे केंद्र सावनेरला देऊ अशी घोषणा केली होती . जर सरकारने येत्या आठ दिवसात नाफेडची (सी.सी.आय) प्रमाणे खरेदी सुरू न केल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा निवेदनात म्हटले आहे .
निवेदन देताना आम आदमी पक्षाचे पंकज घाटोळे , संजय टेंभेकर , संजय राऊत, छत्रपती लांबट , गजानन चौधरी , अन्सार शेख , वैशाली जंजाळ , फुटाणे प्रामुख्याने उपस्थित होते .