डुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

डुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

शेवगाव :-शेवगाव तालुक्यातील जोरापुर येथील शेतकरी अनिल लक्ष्मण भापकर (वय- 45) यांच्यावर मंगळवारी संध्याकाळी रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात भापकर गंभीर जखमी झाले आहेत. संध्याकाळी बाजरीच्या पिकावर पाणी बदलण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक पाच ते सहा रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला केला यामध्ये ते गंभीर जखमी झाले. पायाला डुकरांनी चावा घेतला. शेवगाव येथील एका खाजगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.