मुळापाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या कामकाजाच्या चौकशीचे आदेश.
मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता कुमारी सायली पाटील यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश नुकतेच अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधीकरण नाशिक यांना मा मुख अभियंता यांचे निर्देशान्वये मा. सहाय्यक मुख्य अभियंता जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांचेकडून प्राप्त झाले आहेत
या बाबतचे सविस्तर वृत्त की मुळा जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता कु सायली पाटील यांच्या कामकाजाची चौकशी होऊन त्यांना तात्काळ निलंबीत करावे अशी मागणी पत्रकार सचिन वसंत पवार यांनी मा मुख्य अभियंता जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश नाशिक यांचे कडे लेखी तक्रारी द्वारे केली होती
या तक्रारीत श्री पवार यांनी म्हटले आहे की अहमदनगर जिल्हयाची जिवनदायीनी असलेले मुळधरण हे कु सायली पाटील यांच्या ताब्यात असुन त्यांचे कार्यकाळात मुळा धरणाची वाताहात झालेली आहे . मुळा धरणा मध्ये राहुरी कृषी विद्यापीठाच्या बांधकाम शाखेच्या विद्यापीठ अभियंत्याने जॅकवेलचे काम केले सदर जॅकवेलसाठी ॲप्रोच ब्रिज चे प्रयोजन असताना तसे न करता नमुद विद्यापिठ अभियंत्याने मुळा धरणात जलसंपदा खात्याची कोणतीही परवाणगी न घेता ३५०० ब्रास इतका मुरूम बेकायदेशीर रित्या टाकुन धरणाचा पाणलोट क्षेत्राचा भाग बुजवून टाकला आहे या बाबत मा कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अहमदनगर यांचे कडे वेळोवेळी तक्रारी करूनही कु सायली पाटील यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही अधिक्षक अभियंता जलसंपदा विभाग नाशिक यांनी सदर मुरूम काढुन घेण्या बाबत कार्यवाही करण्याचे आदेश असुनही पाटील मॅडम यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी न करता सदर आदेशाची पायमल्ली करून राहुरी कृषी विद्यापीठ अभियंत्यास पाठीशी घातले .मुळा धरणात पुर्वी चालत असलेली जिल्हा परिषदेची ज्ञानेश्वरी नावाची बोट तात्कालीन उपअभियांत श्री आंधळे यांनी परस्पर गायब केली या बाबत काही लोक प्रतिनिधींनी पाटील मॅडम यांचे कडे तक्रारी केल्या असता या तक्रारीकडेही कार्यकारी अभियंता मॅडम यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले , मुळाधरणावर उपलब्ध झालेले भंगार साहीत्य हे देखिल परस्पर गायब केले मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन करणाऱ्या व्यावसायिकांनी मोठमोठे शेड उभारले आहे सदर व्यावसायीकांच्या अतिक्रमणा बाबत कु सायली पाटील यांना विचारना केली असता या बाबत समर्पक उत्तर न देता अतिकमण धारकांवर कारवाई न करता पाटील मॅडम यांनी या गोष्टी जानुन बुजुन कानामागे टाकल्या तसेच मुळाधरणावर काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांना वेतनचिठ्ठया , कर्मचारी असले बाबतचे ओळखपत्र त्यांची हजेरी पत्रके व त्यांचे सुरक्षेसाठी केलेल्या उपाययोजना या बाबतचे कोणतेही अभिलेख तयार न करता सदरचे कर्मचारी हे केवळ काम करतात व त्यांना हातावर पगार दिला जातो हि बाब अत्यंत गंभिर स्वरूपाची आहे या बाबत कार्यकारी अभियंता पाटील मैडम सक्षम नसल्याचे दिसुन येत आहे , तरी कु सायली पाटील यांचे कामकाजाची चौकशी होऊन त्यांना तात्काळ निलंबीत करावे अशी मागणी या तक्रारी द्वारे करण्यात आली आहे सदर तक्रारीची दखल घेत वरिष्ठांनी कु सायली पाटील यांच्या चौकशीचे आदेश जावक क्रमाक उमप्र /दप / १२३१ / सन २०२४ दिनांक २२/०३/२०२४ अन्वये मा अधिक्षक अभियता प्रशासक विकास प्रधिकरण नाशिक यांना प्राप्त झालेले आहेत कु .पाटील मॅडम यांची काय चौकशी होणार व वरिष्ठ काय कारवाई करणार या कडे जनतेचे लक्ष लागुन आहे .