तांत्रिक सहाय्यकांचे आभावी मनरेगा चे कामे खोळंबली - सभापती संजय डांगोरे

तांत्रिक सहाय्यकांचे आभावी मनरेगा चे कामे खोळंबली - सभापती संजय डांगोरे

काटोल- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यात  रोजगाराची हमी राज्य सरकार देते. यात ही कामे ग्रामविकास मंत्रालयाचे माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या देखरेखीखाली ग्रामपंचायत क्षेत्रात खालील  मूलभूत व पायाभूत  कामें केले जातात. मात्र या कामांचे तांत्रिक पाहणी व निरिक्षण ठेवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ 'तांत्रिक सहाय्यकांचे पदे रिक्त' आहेत.  यामुळे मनरेगा ची कामें खोळंबली असल्याचे सभापती संजय डांगोरे यांनी सांगितले आहे.

 त्यांनी माहिती दिली की मनरेगा चे मार्फत शाळेसाठी संरक्षण भिंत बांधकाम ,शाळेकरिता मैदानाकरिता साखळी कुंपण ,शालेय स्वयंपाकगृह निवारा ,अंगणवाडी बांधकाम ,ग्रामपंचायत भवन ,सार्वजनिक जागेवर गोदाम ,स्मशानभूमी शेड बांधकाम ,बचत गटांच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे ,छतासह बाजार ओटा/ मासे सुकवण्यासाठी व विक्रीसाठी ओटा ,सामुहिक मत्स्यतळे ,सिमेंट रस्ता ,डांबर रस्ता ,पेव्हिंग ब्लॉक रस्ता ,नाला मोरी टेस्टीगं, सिमेंट नाला बांध ,आर.सीसी मुख्य निचरा प्रणाली, भूमिगत बंधारा, रेनहार्वेस्टिंग ,खचलेल्ला विहीर दुरुस्ती, व नवीन विहिरीत च बांधकाम देखभाल, पांधन रस्ते

 

या सारख्या  मूलभूत व पायाभूत सुविधांचा चे बांधकाम मंजूरी व देखरेखीसाठी पंचायत समिती स्तरावर  तांत्रिक सहाय्यकांची   पदे भरली जातात. नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत काटोल पंचायत समिती मधे दोन तांत्रिक सहाय्यकांची  पदे मंजूर आहेत, मात्र सध्या स्थितित दोन्ही पदे रिक्त  असल्याने पंचायत समितीच्या 83 ग्रामपंचायतींची   मनरेगा मार्फत करायची कामांचे बांधकाम थाबले आहे.

 राज्य शासनाकडे मनरेगा चे तांत्रिक सहाय्यकांची पदे पुर्वी ची मागणी करूनही येथील दोन्ही तांत्रिक सहाय्यकांचे पदे अजून ही भरण्यात आली नाहीत,अशी माहिती काटोल पंचायत समिती चे सभापती संजय डांगोरे यांनी दिली आहे. या बाबद काटोल पंचायत समितीचे बी डी ओ संजय पाटील यांना विचारले असता सांगितले की येथील मनरेगा च्या तांत्रिक सहाय्यकांची दोन्ही पदे रिक्त आहेत. या बाबद जि प चे  वरिष्ठ अधिकार्यांना  माहिती दिली आहे. सध्या नरखेड पंचायत समिती चे तांत्रिक सहाय्यकांची आठवड्यात दोन दिवस  पाहणी सेवा देत आहेत. मात्र  नियमित तांत्रिक सहाय्यक नसल्यामुळे मनरेगा ची अनेक कामें खोळंबली आहेत.