...अखेर काटोल नगर परिषदेतील झोपड पट्टिवासीयाचां मार्ग मोकळा

1.

काटोल :- ..अखेर वर्षानुवर्ष वाट पाहत असलेल्या झोपदपट्टि वासीयांची मालकी पट्ट्याची मागणी शेकाप वंचित बहुजन आघाडी यांच्या वतिने अनेक वर्षापासून झोपड पट्टिवासीयाना मालकी हक्काचे पट्टे मिळावे यासाठी मोठमोठे आंदोलन करण्यात आले होते.

तसेच मागील डिसेंबर 2022पासुन नगर परिषदेत मुख्याधिकारी यांना निवेदन देणे घेराव करणे मा.आमदार अनीलबाबु देशमुख व माजी नगराध्यक्ष राहुलबाबु देशमुख तसेच माजी नगर विकास मंत्री मा. प्राजक्ता तानपूरे यांच्या जनता दरबारात मांडलेली आक्रमक भुमिका तसेच झोपड़पट्टि धारक बान्धवाची सामाजिक कार्यकर्ते हर्षद बनसोड यांनी आयोजित केलेल्या अण्णाभाऊ साठे नगर च्या जाहीर सभेतून प्रभावी पणे मांडलेली भुमिका व मा मुख्याधिकारी यांना मालकी पट्टया साठी दिलेला निवेदन यासर्व आंदोलनाची दखल घेत शेवट मुख्याधिकारी यांनी प्रामाणिक पणे घेतलेल्या भूमिकेमुळे मालकी पट्ट्याची प्रकीयेला सुरवात झाली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून आज पेठबुधवार येथील प्रेमनगर तकीया किल्ला वार्ड सराई व भगवान दत्तात्रय मंदिर व माता मंदिर मागील सुलभ शौच्छालय जवळील भाग या परीसाराची भुमापण विभाग नगर परिषद व माजी विरोधी पक्षनेते संदीपभाऊ वंजारी व माजी सभापती दिगांबर डोंगरे व झोपडपट्टि वाशी.मारोतराव सुरजुसे नामदेवराव बगवे ,सिकंदर पटेल, गणेश हागोणे, टिकाराम भस्मे, सुरेश पोहणे ,हरी चचाणे ,शाबीर शैख, अक्षय सावरकर, शुभम आन्बुडारे ,शुभम दुपारे ,विक्कि धोटे, आकाश महाजन,नासीरभाई शैख यांच्यासह मोठ्या प्रमाणात येथील बांधवांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली. आपली मागणी मंजुर झाल्याचा आनंद अनेकांनी व्यक्त केला.